बदली अपडेट..!

 बदली अपडेट..!


जिल्हा बदली नियंत्रण कक्षाने दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या सूचनेनुसार त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी अवघड क्षेत्रात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी तयार होणारी सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल असे म्हटले होते परंतु अद्याप सदर सेवाजेष्ठता यादी पोर्टलवर तयार झाली नाही आणि प्रसिद्ध देखील झाली नाही.


अर्थात पोर्टल चालणारी कंपनी म्हणजेच विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ने ग्रामविकास विभागाकडे काही शंका उपस्थित केल्या होत्या व त्या शंकांचे समाधान करण्यासंदर्भात शासनाने स्पष्टीकरण दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी दिले होते त्या स्पष्टीकरणानुसार सेवाजेष्ठता यादी तयार होण्यास व पोर्टलमध्ये तशा प्रकारचे बदल करण्यास वेळ लागल्यामुळे अजून देखील याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही.


परंतु हे होऊन जवळपास चार दिवस झाले असल्यामुळे आज संध्याकाळपर्यंत याद्या प्रकाशित होऊ शकतात त्यासोबतच कोणत्या अवघड क्षेत्रातील शाळेत जागा रिक्त आहेत अशा रिक्त जागांची यादी देखील जाहीर होऊ शकते.


अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची यादी व अवघड क्षेत्रात बदली होणाऱ्या शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी जाहीर झाल्यानंतर लगेच पोर्टलवर सदर यादीतील शिक्षकांना आपला अवघड क्षेत्रातील शाळांचा प्राधान्यक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.



दिनांक 16 फेब्रुवारी 2023


🚨बदली पोर्टल महत्त्वाचे🚨


📌जि. प. बुलडाणा अंतर्गत 46 शिक्षक संवर्ग 4 (दुसरी फेरी ) अंतर्गत पात्र होते  त्यापैकी  39 शिक्षकांना पोर्टल द्वारे त्यांचे पसंतीक्रमानुसार बदली मिळाली आहे.बदली पात्र दुसऱ्या फेरीमध्ये बदली झालेले शिक्षकांची यादी, यानंतर राहिलेले बदली पात्र शिक्षकांची यादी, रिक्त पदांची यादी  मा. शिक्षणाधिकारी यांचे लॉगीन मधून प्रकाशित करण्यात आली असून सुलभ संदर्भासाठी या सोबत पुरविण्यात येत आहे.


📌यानंतर अवघड क्षेत्रातील रिक्त राहणाऱ्या पदांची यादी उद्या प्रकाशित करण्यात येईल.


जिल्हा बदली नियंत्रण कक्ष

जिल्हा परिषद बुलडाणा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



दि १६/०२/२०२३ वेळ :- स.८.०५ मी




विस्थापित शिक्षक (Eligible Round - 2) च्या याद्या Generate झालेल्या आहेत. लवकरचं वरिष्ठांच्या सुचने नुसार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.


टीप:- ही फेरी पूर्ण होऊन सुद्धा जर अवघड भागातील जागा रिक्त राहत असल्यास सुगम क्षेत्रातील १० वर्ष सेवा पूर्ण केलेले आणि सदरील शाळेत ५ वर्ष पूर्ण न झालेल्या शिक्षकांची फेरी सुरू केली जाणार आहे.


विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्याशिवाय बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही - उच्च न्यायालय.


पुढील वर्षीच्या बदल्यांची प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार संवर्ग एक संवर्ग दोन साठी तीन वर्ष सेवेची अट नसणार.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.