📌 जिल्हाअंतर्गत बदली :- संवर्ग 4 बाबत कार्यालयीन अपडेट्स.
बदली अंतिम यादी संवर्ग 4
बदली पोर्टल 2022
दि.07/02/2023
वेळ 3.28 AM
विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी कडून प्राप्त मेसेज
👇👇👇👇
NOTE
We have completed all the list generation of PDF and Alignment and Corrections with Right Labels
Logins have been Enabled for all EO and CEO Once you download confirm we will open teacher logins
बदली यादी झालेला चुका दुरुस्त करून नवीन बदली याद्या तयार झालेल्या आहेत. सदर याद्या डाउनलोड करण्यासाठी शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मधून कन्फर्म झाल्यानंतर शिक्षक लॉगिन लगेच सुरू होणार आहे.
बदली कक्ष
शिक्षण विभाग (प्रा.)
जिल्हा परिषद नांदेड
(दि.06.02.2023)
वेळ : 07:00 PM
सर्व जिल्ह्यासाठी व्हिसीस कडुन आलेला मॅसेज.
👇👇👇👇
NOTE
पीडीएफ निर्मिती प्रक्रियेत आहे आणि एकदा पूर्ण झाल्यावर आम्ही पडताळणीवर प्रक्रिया करू. सत्यापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आम्ही नवीन सूची डाउनलोड करण्यासाठी मा. EO/CEO साठी प्रणाली जारी करू. कृपया लक्षात घ्या की शेवटची यादी अवैध आहे आणि त्यात योग्य डेटा नाही आणि विचारात घेऊ नये.
NEXT UPDATE AT 8.30PM
बदली कक्ष
शिक्षण विभाग (प्रा)
जिल्हा परिषद नंदेड
जिल्हा अंतर्गत बदली Revised यादी प्रसिद्ध करण्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत अद्याप CEO-EO लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.
❌❌❌
मात्र काही घटक हे CEO लॉगिन / बदली यादी उपलब्ध झाल्याचे चुकीचे अपडेट्स पाठवून शिक्षक बांधवामध्ये यासंदर्भात संदीग्धता निर्माण करीत आहेत.
जे की प्रशासकीय दृष्टीने पूर्णतः चुकीचे आहे..!
❌❌❌
तथापि, याद्वारे सर्व शिक्षक बांधवांना कळविण्यात येते की, कुणीही अशा अनाधिकृत अपडेट्स वर विश्वास ठेऊ नये.
📛 टिप :- RDD/Vinsys मार्फत सर्व लॉगिन (Teacher-BEO-EO-CEO) हे एकाच वेळी उपलब्ध करून दिले जातात.📛
▶️ संवर्ग-04 Revised Transfer List उपलब्ध झाल्यानंतर रीतसर बदली यादी आणि रिक्तपद यादी ही बदली नियंत्रण कक्षामार्फत अधिकृतपणे कळविण्यात येईल.
-बदली नियंत्रण कक्ष,
जिल्हा परिषद जालना.
जिल्हांतर्गत बदल्या संदर्भात थोडेसे....6
विन्सेस कंपनीतील कॉर्डिनेटर यांच्याशी फोनवरून आज सोमवार दिनांक - 6 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6:45 वाजता झाली चर्चा.
👉 कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगण्यात आले.
👉 बदल्या रद्द होणार नाहीत किंवा पुन्हा माहिती भरावी लागणार नाही असेही सांगितले.
👉 संवर्ग चार पती-पत्नी एक युनिटमध्ये थोडी गडबड.... उदाहरणार्थ - पत्नीचे नाव न येता फक्त पतीचे नाव टाईप होणे किंवा यु-डायस कोड बदलणे .... हा प्रिंटिंग दोष आहे दुरुस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात .
👉 दुसरी अडचण पती-पत्नी एक युनिट मानून बदली मागितलेल्या शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेत रिक्त असणाऱ्या दोन जागेवर बदली मागितली असल्याने अशा झालेल्या बदलीमध्ये जोडीदाराला त्याच्याच शाळेमध्ये बदली मिळाली असल्यामुळे जोडीदाराची त्या शाळेत बदलीची तारीख नवीन पडणे अपेक्षित.... ती दिसत नव्हती.... ती बदलणे अपेक्षित .... जर बदलली नाही तर पुन्हा संबंधित शाळेत असणारा जोडीदार यावर्षीच्या पुढे नव्याने होणाऱ्या बदलीत बदली पात्र होऊ शकतो ..... ही तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरू असून कोणत्याही परिस्थितीत आजच याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
👉 सदर तांत्रिक अडचण दूर करून नव्याने याद्या दुरुस्त करून जनरेट करण्याचे काम चालू असून लवकरच संवर्ग चारच्या बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
👉वरील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन विन्सेस कंपनीच्या कॉर्डिनेटर यांच्या कडून माहिती देण्यात आली. बदली प्रक्रिये संदर्भात निर्माण झालेल्या काही शंका विचारण्यात आल्या त्या शंकांचे निरसन केले गेले.
सध्या ग्रुप वर फिरत असणारे व्हिडिओ व बदली प्रक्रिया रद्द होण्याबाबतची चर्चा याविषयी सविस्तर चर्चा झाली. बदली प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही कोणत्याही व्हिडिओवर व चुकीच्या चर्चेवर विश्वास ठेवू नये असे विन्सेस कंपनीकडून सांगण्यात आले.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टीप - हे फोनवरून झालेले संभाषण असून हे अधिकृत न मानता बदली संदर्भात जिल्हास्तरावरील नोडल अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी अधिकृत सूचना दिल्या जातील त्या ग्राह्यधराव्यात.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments