जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये दिव्यांगांमधून बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश.
बदली प्राधान्य अत्यंत महत्त्वाचे...
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये दिव्यांग मधून बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सदर आदेशानुसार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुचित केले आहे की जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग भाग एक मधील दिव्यांग मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांपैकी जिल्हा परिषद सेवेत नियुक्तीपूर्वी दिव्यांग असलेले शिक्षक वगळता सेवेत रुजू झाल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांना तसेच ज्या शिक्षकांनी पती पत्नी सेवेत असणाऱ्यांपैकी दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे अशा सर्व शिक्षकांना वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त करून अहवाल या कार्यालयास सादर करणेबाबत गटशिक्षणाधिकारी स्तरावरून निर्देश देण्यात यावे.
करिता पुढील कार्यवाहीस्तव रवाना.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments