सातवा वेतन आयोग हप्ता 1/2/3 अपडेट - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक.
महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय या कार्यालयातून दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील खर्चाबाबत नियमित वेतना व्यतिरिक्त इतर देवकी ऑफलाइन पद्धतीने अदा करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सन 2022 23 आर्थिक वर्षात वेळोवेळी बिम्स प्रणालीवर शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान वितरित करण्यात आले आहे. सन 2022 23 या आर्थिक वर्षातील शिल्लक कालावधी विचारात घेता प्राप्त अनुदान शंभर टक्के खर्च होणे आवश्यक आहे. यासाठी संदर्भीय शासन नियमाद्वारे नियमित फेब्रुवारी 2023 चे वेतनाव्यतिरिक्त इतर थकीत देयके वैद्यकीय देयके सुधारित वेतन संरचनामुळे मूळ वेतनात फरक इत्यादी ऑफलाइन पद्धतीने अदा करणे बाबत मार्च 2023 पर्यंत शासनाने मान्यता दिली आहे.
सर्व लेखाशीर्षाच्या बाबतीत माहे फेब्रुवारी 2023 चे नियमित वेतन अदा झाल्यानंतर उपलब्ध अनुदानातून संदर्भीय शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमानुसार देयके अदा करण्यात यावी.
शासन निर्णयानुसार अनुदान स्थितीनुसार सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता संदर्भीय शासन निर्णयातील मुद्दा यामध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित दिव्याची नोंद शालार्थ प्रणालीत करणे बंधनकारक राहील.
वरील प्रमाणे सर्व देखे अदाहून तरतूद शिल्लक असल्यास सातव्या वेतन आयोगाचा तिसऱ्या हप्त्याची देयके अदा करावीत.
उपरोक्त बाबीसाठी अनुदान उपलब्ध असताना विहित कालावधीत म्हणजे दिनांक 31 मार्च 2023 पूर्वी देयके पारित न झाल्याने भविष्यात प्रश्न निर्माण झाल्यास याबाबतची वैयक्तिक जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांना देविदास कुलाळ शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांनी दिले आहेत.
वरील प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments