फेब्रुवारी पेड़ इन मार्च 2023 शालार्थ देयका सोबत सातवा वेतन आयोग पहिला व दुसरा हप्ता महागाई भत्त्याच्या रकासह फॉरवर्ड करणेबाबत आदेश.
शिक्षण (निरीक्षक) अधिकारी मुंबई यांनी दिनांक 8 फेब्रुवारी 2023 निर्गमित केलेल्या आदेशानुसार फेब्रुवारी 2023 चे नियमित वेतन देयक सादर करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
माही फेब्रुवारी 2023 पेड इन मार्च 2023 चे नियमित वेतन देयक या कार्यालयात सादर करताना सर्व लेखा शीर्षांतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या पहिला व दुसरा हप्ता देणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. याकरिता शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा सुरू झालेली आहे त्यासाठी शालार्थ प्रणालीच्या होम पेज वर युजर मॅन्युअल देखील उपलब्ध आहे.
सर्व संबंधितांना सूचना देण्यात येते की माहे फेब्रुवारीच्या नियमित वेतन देयका सोबत वाढीव महागाई भत्ता फरक व सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्त्याची देयक समाविष्ट करून सदर फेब्रुवारी चे नियमित वेतन देयक दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करून हार्ड कॉपी या कार्यालयास सादर करावी.
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ झालेली आहे त्यानुसार वाढीव मानधन माहे जानेवारी 2023 च्या फरकासह शालार्थ प्रणालीतून अदा करावे.
तसेच पात्र व कार्यरत कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगात ची तिसऱ्या हप्त्याची देयके ऑफलाइन पद्धतीने शाळा स्तरावर तयार ठेवावीत. अनुदान उपलब्धतेची स्थिती पाहून देयके सादर करण्यासाठी स्वतंत्र सूचना देण्यात येतील.
शालार्थ वेतन प्रणाली ही संपूर्ण महाराष्ट्र साठी लागू असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील वरील प्रमाणे देयके सादर करावी लागतील.
त्यामुळे माहे फेब्रुवारी पेड इन मार्च 2023 या महिन्याच्या वेतनासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाचे पहिला व दुसरा हप्ता तसेच वाढीव महागाई भत्त्याचा फरक सदर वेतनात मिळणार आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments