राज्यातील 1525 शाळांना मिळणार डिजिटल लायब्ररी स्थापित करण्यासाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाने दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार स्टार्स प्रकल्पांतर्गत राज्यातील निवडक 1525 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी स्थापित करण्यासाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर पुरवठ्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
1) बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची एप्रिल 2010 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक सहा ते 14 वयोगटातील मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. विविध शैक्षणिक सर्वेक्षणात जसे की नॅशनल अचीवमेंट सर्वे व असर यांच्या अहवालात सातत्याने मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत घसरन होत असल्याचे दिसून आल्याने सन 2015 2016 पासून राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे.
2) प्रस्तुत कार्यक्रमांतर्गत मुलांच्या वाचनात भर पडण्यासाठी व त्यांना विविध विषयांची पूरक वाचनाची ही पुस्तके उपलब्ध करून देऊन त्यांच्या शैक्षणिक संपादनूक पातळी वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने डिजिटल लायब्ररी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार त्याची प्रायोगिक तत्त्वावर दोन शाळांमध्ये अंमलबजावणीही करण्यात आली. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन वर्गातील शैक्षणिक वातावरण अधिक उत्साही राहील आणि विद्यार्थी सतत स्त्रियाशील राहतील ही बाब विचारात घेऊन शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचा वयोगट व विविध विषयातील अध्ययन निष्पत्तीचा विचार करून डिजिटल लायब्ररी विकसित करण्याच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या विविध भाषा विषयातील दृढीकरण व समाज दृढ होतील तसेच त्याचे उपयोजन आणि कौशल्यात रूपांतर करण्यास उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवनामध्ये व भविष्यात देखील विद्यार्थ्यांसाठी त्याचा लाभ होईल.
3) सन 2022 23 या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत रुपये 25. 62 कोटी इतकी तरतूद मंजूर असून सदर मंजूर तरतुदीच्या मर्यादेच्या अधीन राहून राज्यातील निवडक पंधराशे पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय शाळांना डिजिटल लायब्ररी उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये 100 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या 1255 शाळांमध्ये दहा टॅबलेट आणि 100 पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या 270 शाळांमध्ये 20 टॅबलेट सह डिजिटल लायब्ररी उपलब्ध करून देण्यासाठी ही निविदा प्रक्रियेद्वारे इंडस एडिट्रेन प्रायव्हेट लिमिटेड यांची पुरवठाधारक म्हणून निवड करण्यात आलेली असून त्या शासनाने दिनांक 3 जानेवारी 2023 च्या पत्रा अन्वये मान्यता प्रदान केली आहे. मुक्त पुरवठादारास या कार्यालयाच्या संदर्भीय पत्राद्वारे पुरवठा आदेश निर्गमित करण्यात आलेले असून सदर पुरवठाधारक का मार्फत सोबतच्या यादीतील शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यात येणार आहे.
सदर डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर सॉफ्टवेअर स्वीकारणे व त्याचा वापर करणे यासंदर्भात खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
A) सोबत जोडलेल्या वितरण तक्त्याप्रमाणे डिजिटल लायब्ररीच्या हार्डवेअर व सॉफ्टवेअर पुरवठाधारक कंपनी मार्फत आपल्या जिल्ह्यातील शाळेत प्राप्त होतात त्याचा तत्काळ स्वीकार करण्यात यावा.
B) सदर साहित्य सोबत पुरवठाधारकाने दिलेल्या पोच पावती रिसिप्ट डिलिव्हरी चलन वर नमूद आणि प्रत्यक्ष प्राप्त झालेले डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर बरोबर असल्याची खात्री करून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा शिक्षक यांनी दिनांक स्वाक्षरी व व शिक्क्यासह पोहोच द्यावी. पोहोच देतेवेळी शाळेचे मुख्याध्यापक अथवा शिक्षक यांनी पोहोच पावतीवर स्वतःचे नाव मोबाईल नंबर तसेच दिनांक स्वाक्षरी करून शाळेचा शिक्का पोहोच पावतीवर द्यावा.
C)पोहोच पावती तीन प्रतीमध्ये असेल त्यापैकी एक पोचपावती शाळा स्तरावर जतन करून ठेवावी व उर्वरित दोन पोच पावत्या संबंधित पुरवठाधारकाच्या प्रतिनिधीकडे देण्यात याव्या.
D) प्राप्त झालेल्या डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर सॉफ्टवेअरच्या सविस्तर नोंद तपशीलासह शाळेच्या साठा नोंदवही मध्ये घेण्यात यावी व साहित्य अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील वापरासाठी तात्काळ शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे.
E) डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर पुरवठ्याची वाहन शाळा स्तरावर पोहोचल्यावर डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर तात्काळ उतरवून घेऊन ताब्यात घ्यावे विनाकारण वाहन राहणार नाही याची दक्षता घेऊन पुरवठादाराच्या प्रतिनिधी ला आवश्यक ते सहकार्य करावे.
शाळांना डिजिटल लायब्ररी हार्डवेअर व सॉफ्टवेअर प्राप्त झाले असल्याची खात्री करण्याच्या दृष्टीने शाळा स्तरावर पुरवठा करण्यात येणाऱ्या डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर चे फोटोग्राफ्स सादर करण्याबाबत पुरवठादारास निर्देश देण्यात आलेले आहे. सबब डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर तब्येत घेतेवेळी फोटो पुरवठा दराच्या प्रतिनिधीमार्फत घेण्यात येणार आहे. तरी सदरचे फोटोग्राफ अचूक रित्या घेण्याकरिता पुरवठादाराच्या प्रतिनिधी आवश्यक ते सहकार्य करावे.
G) उपलब्ध करून देण्यात आलेले डिजिटल लायब्ररीच्या हार्डवेअर सॉफ्टवेअर प्राप्त होताच तात्काळ अध्ययन अध्यापनासाठी वापरत घेण्यात यावे व ते शाळेमध्ये सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्यात यावे. डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर वाहतुकीमध्ये तुटपुट आढळल्यास सदरची बाब तात्काळ पुरवठा दराच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून देण्यात यावी तसेच पोहोच पावतीवर संपर्क करता हेल्पलाइन नंबर दिलेला असून त्यावर देखील संबंधितांना तात्काळ संपर्क करून साहित्य बदलून घ्यावे.
साहित्य बदलून घेण्यामध्ये आपले समाधान न झाल्यास तसेच साहित्याचा दर्जा व तूट फूट गंभीर स्वरूपाची असल्यास त्याबाबतचे आपले म्हणणे अथवा तक्रार साहित्य प्राप्त झाल्याच्या दिनांक पासून पंधरा दिवसाचे आत या कार्यालयास कळवावे.
5) डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअरच्या स्थापनेसाठी आयसीटी लॅब प्रमाणे आवश्यक वर्गखोली अखंडित वीज पुरवठा स्विच इलेक्ट्रिक पॉईंट्स आवश्यकतेबल खुर्चीसारखी फर्निचर योग्य नेटवर्क स्विच सहल अँड नेटवर्किंग ची आवश्यकता आहे याबाबतची सुविधा पुरवठादारास उपलब्ध करून देण्यात यावी.
सदर डिजिटल लायब्ररीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअरच्या शाळेतील प्रभावी वापरामुळे निश्चितच केंद्र शासनाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स, की रिझल्ट एरिया मधील राज्याच्या शैक्षणिक गुणांकनात वृद्धी होण्यासाठी मदतगार ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील प्रभुत्व आणि संपादन खूप पातळी वाढ करण्यासाठी तसेच आगामी राष्ट्रीय शैक्षणिक संपादन सर्वेक्षण आणि विद्यार्थ्यांच्या अन्य विविध स्पर्धा परीक्षा करिता व अभ्यासक्रमातील अपेक्षित असणारी अध्ययन निष्पत्ती मुले सहजतेने साध्य करतील.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यासाठी सॉफ्टवेअर व हार्डवेअर मिळणाऱ्या शाळांची यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments