राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 14 फेब्रुवारी 2023 शासन निर्णय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 व इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. सदरचे अभियान सर्व विभागांनी निवडणूक अभियानाप्रमाणे सामूहिकरीत्या राबविणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षा दरम्यान पुढील प्रमाणे कपियुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी.
राज्याचा नोडल अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि यांना प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
तसेच समन्वयक अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना नियुक्त करण्यात आले आहे तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. सदर अभियान यशस्वीपणे राबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी.
परीक्षेच्या दरम्यान बंदोबस्तासाठी कर्तव्य असलेल्या पोलिसांनी परीक्षा कक्षामध्ये प्रवेश करू नये परीक्षा केंद्राच्या परीघय भागामध्ये बंदोबस्ताचे काम पार पडावे.
परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्या.
संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रावर शक्यतो चित्रीकरण व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे.
जनजागृती मोहीम..
शिक्षक मुख्याध्यापक शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे.
जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची जिल्हाध्यक्षता समिती नियुक्त करणे.
माध्यमांद्वारे शाळा आणि पालकांची संवाद साधावा.
पोलीस बंदोबस्त...
50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीला प्रवेश नाही.
अति संवेदनशील संवेदनशील सर्वसाधारण असे परीक्षा केंद्राचे वर्गीकरण करण्यात यावे.
1973 च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात यावेत.
50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स ची दुकाने बंद ठेवण्यात यावी.
विद्यार्थ्यांची झडती..
शंभर टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रात प्रवेश यावेळीच झडती घेण्यात यावी.
पोलीस पाटील कोतवाल शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची तपासणी करण्यात यावी तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस शाळेतील महिला कर्मचारी यांच्याकडून मुलींची तपासणी करावी.
महसूल विभागाची बैठी पथके..
पूर्णवेळ बैठे पथक नेमण्यात यावे.
परीक्षा दि एक तास ते परीक्षेनंतर एक तास पत्रिका ताब्यात घेईपर्यंत.
संवेदनशील परीक्षा केंद्रावर वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती.
ज्यांचे मूळ गाव व कामाचे ठिकाणी एकच असेल त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येऊ नये. दररोज बदल करण्यात यावा.
भरारी पथके..
प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक. .. .
विभाग प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद.
अचानक तपासणीसाठी पोलिसांची उपस्थिती झडती बैठे पथक.
जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दौरे.. .
इंग्रजी गणित आणि विज्ञान पेपर साठी दोन दिवस राखीव ठेवणे.
सकाळी तिघांचा आपसात विचार परामर्श व आकस्मिक भेटी.
प्रामुख्याने संवेदनशील तालुके आणि केंद्रांवर लक्ष.
वरील प्रमाणे महाराष्ट्रात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय निर्गमित करून सविस्तर अशा सूचना दिल्या आहेत.
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments