NMMS Update - एन एम एम एस परीक्षेसाठी अंशतः अनुदानित व स्वयं अर्थ सहित शाळेतील विद्यार्थ्यांना अपात्र ठरविणारा आदेश मागे घेण्याबाबत परिपत्रक.

 एन एम एम एस परीक्षेसाठी अंशतः अनुदानित व स्वयं अर्थ सहित शाळेतील विद्यार्थ्यांना अपात्र ठरविणारा आदेश मागे घेण्याबाबत परिपत्रक.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022 मध्ये अंशतः अनुदानित व स्वयं अर्थशास्त्र विद्यार्थ्यांना अपात्र ठरविणारा आदेश मागे घेण्याबाबत निवेदन प्राप्त झाले होते.

सदर निवेदना ला स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले आहे.


निवेदला उत्तर देताना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येते सदर परीक्षेमध्ये विनाअनुदानित स्वयं अर्थ सहित अंशतः अनुदानित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अपात्र केल्याने त्यांच्यावर अन्याय होणार आहे तरी या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परवानगी देऊन न्याय द्यावा तसेच कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये असे आपण निवेदनाद्वारे कळवले होते.


केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या पत्रा अन्वय राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस परीक्षेसाठी खालील नमूद केलेल्या अटीप्रमाणे शाळा व विद्यार्थी सदर परीक्षेसाठी पात्र किंवा अपात्र ठरतात.


खालील विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र आहेत:-

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी.

विद्यार्थी विद्यार्थिनी इयत्ता सातवी मध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती चा विद्यार्थी किमान 50 टक्के गुण मिळवून  उत्तीर्ण झालेला असावा.

पालकांचे म्हणजेच वडिलांचे व आईचे दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3 लक्ष 50 हजार पेक्षा कमी असावे.


खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहे:-


खाजगी विनाअनुदानित स्वयंअर्थसाहित अंशतः अनुदानित शाळेतील विद्यार्थी.

केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.

सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.


केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार या कार्यालयामार्फत परीक्षा बाबतची कार्यवाही केली जाते.


वरील प्रमाणे स्पष्टीकरण देत परीक्षा परिषदेने एन एम एम एस परीक्षेसाठी अंशतः अनुदानित व स्वयं अर्थ सहित शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र करण्यास असमर्थता दर्शवली आहे.



वरील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा



केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने एन एम एम एस परीक्षा संदर्भात पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.