जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2022-23 मधील तक्रारीवर अंतिम निर्णय घेण्याच्या अधिकाराबाबत ग्रामविकास विभागाचा आजचा शासन आदेश.
आज दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय सर्व यांना दिलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन 2022 23 च्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
ग्रामविकास विभागाच्या दिनांक 7 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
लवकरच मांजर जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदली संदर्भात शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2019 मुद्दा क्रमांक 19 व जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 5.10 बदल्याबाबतच्या अनियमिततेची तक्रार यासाठी संबंधित विभागीय आयुक्त यांचा निर्णय अंतिम राहील अशी तरतूद आहे.
तथापि विभागीय स्तरावरील कामकाजाचा आवाका विचारात घेता प्रशासकीय कारणास्तव शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या बाबतच्या तक्रारीवर अंतिम निर्णय घेण्याची अधिकार विभागीय आयुक्तांना किंवा विभागीय आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या संबंधित उपयुक्त आस्थापना यांना राहतील.
असा स्पष्टीकरणात्मक शासन आदेश आज ग्रामविकास विभागाने निर्गमित केला आहे.
त्यामुळे जर जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत अनियमितता आढळून आली असल्यास संबंधित शिक्षक सदरची तक्रार संबंधित विभागीय आयुक्तांकडे करू शकणार आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments