खुशखबर - दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी मिळणार दहा मिनिटं जास्त वेळ!

 खुशखबर - दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी मिळणार दहा मिनिटं जास्त वेळ.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केलेल्या प्रकटनानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरित करण्याच्या कार्यपद्धतीबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळापूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.


इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.


अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावं तसेच परीक्षा निकोप भयमुक्त व कपिल वातावरणात सुरळीत पार पाडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वित्तरिक करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात येत असल्याचे कळविण्यात आलेले आहे.


तथापि विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे.


फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेपासून सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल.

सकाळ सत्रात सकाळी साडेदहा वाजता तसेच दुपार क्षेत्रात दुपारी अडीच वाजता परीक्षा त्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.


परीक्षेच्या सध्याच्या वेळा सकाळी 11 ते दुपारी दोन किंवा सकाळी 11 ते दुपारी एक किंवा सकाळी 11 ते दुपारी एक वाजून 30 मिनिट अशा पद्धतीच्या आहेत त्या वाढवून परीक्षेचा सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी दोन वाजून दहा मिनिटे किंवा सकाळी 11 ते दुपारी एक वाजून दहा मिनिटे किंवा सकाळी 11 ते दुपारी एक वाजून 40 मिनिटे असा करण्यात आला आहे.


तर दुपार सत्रासाठी दुपारी तीन ते सायंकाळी सहा किंवा दुपारी तीन ते सायंकाळी पाच किंवा दुपारी तीन ते सायंकाळी पाच अशा पद्धतीने पेपरनुसार दुपारचा वेळ देण्यात आलेला होता परंतु सुधारित वेळेनुसार आता दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटे किंवा दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटे किंवा दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजून 40 मिनिटे असा सुधारित वेळ करण्यात आलेला आहे.


या अगोदर प्रश्नपत्रिका फक्त आकलनासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येत होती विद्यार्थी उत्तर पत्रिकेवर उत्तरे लिहिणे सुरू करू शकत नव्हती परंतु आता सुधारित वेळेनुसार विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेवर उत्तरे लिहिण्यासाठी दहा मिनिटे अधिकचा वेळ वाढवून देण्यात आलेला आहे.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏






Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.