संवर्ग चार च्या बदलीनंतर उपस्थित झालेले काही प्रश्न व विन्सइस ने शासन निर्णयानुसार दिलेले स्पष्टीकरण.
संवर्ग चार ची बदली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बरेच प्रश्न उपस्थित झाले आहे सदर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ने एक पीपीटी प्रसिद्ध करून त्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत प्रश्न व उत्तरे पुढील प्रमाणे.
मी बदली अर्ज भरलेला नसून देखील माझी बदली का झाली?
शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 4.5.4 नुसार आपली बदली उपलब्ध जाग्यानुसार कुठेही होऊ शकते.
काही शिक्षक शासन निर्णय नवाजता अशा चुकीच्या अफवा पसरत आहे त्याची बदली कक्षा आणि नोंद घ्यावी व शासन निर्णयातील 4.5.4 मुद्दा वाचावा.
जिल्हा नियंत्रण कक्षातील काही नोडल अधिकारी यांचे सुद्धा या पॉईंट कडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यांनी ही परत वाचावा अशा सूचना सदर पीपीटी मध्ये देण्यात आल्या आहे.
माझ्यापेक्षा जुनियर ला माझे ऑप्शन का बरं मिळाले?
शिक्षकांनी सेवाजेष्ठता स्वतः पडताळून पहावी जेव्हा एखादी सेवा जेष्ठ शिक्षकाला तुमच्या पसंती कामाची शाळा मिळते आणि तुम्हाला मिळत नाही तेव्हा तुम्ही खालील बाब पडताळून पहावी..
एक तर हा कमी सेवा जेष्ठ शिक्षक तुमच्यापेक्षा सेवा जेष्ठ असलेल्या शिक्षकाचा जोडीदार असेल आणि त्यांना एक एकक मधून बदली मिळाली असेल.
बदलीनंतर सुद्धा माझी शाळा तीच राहिली वन युनिट बेनिफिट जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराची शाळा मागितली आणि शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.3.4 प्रमाणे
(पर्याय आणि ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किलोमीटरच्या आतील परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल)
मी विकल्प दिले होते तरी माझी बदली झाली नाही असे का?
दिलेल्या जागांमध्ये मला बदली मिळाली नाही.
किंवा मी नॉट वेलिंग फॉर ट्रान्सफर मला बदली नको असे भरले होते मग बदली कशी होईल पण जर तुम्हाला इथे खूप असला आणि किंवा अवघड क्षेत्र असेल तर शासन निर्णय 1.10 प्रमाणे बदली केली जाईल.
मृत किंवा सेवानिवृत्त शिक्षकाची बदली का केली?
प्रक्रियेमध्ये एकदा वेकन्सी पब्लिश झाली व प्रक्रिया सुरू झाली तर सिस्टीम मध्ये काही लोक जीआर प्रमाणे ऍक्टिव्ह आहेत. सिस्टीमला सिस्टीमच्या बाहेरचे कळत नाही.
मी ऑप्शन सेव केले होते पण ते घेतले नाही असे का?
फॉर्म सबमिट केला नाही तर ऑप्शन विकल्प घेतली जात नाही शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.5.4 लागू होतो त्याप्रमाणे उपलब्ध असेल तिथे बदली होते.
मी नमूद केलेली शाळा रिक्त असूनही मला मिळाली नाही रिक्त पदांची माहिती मध्ये अजूनही रिक्त दिसते.
बदली पात्र एक मध्ये रिक्त झालेल्या जागा यापुढील फेरी म्हणजे विस्थापित शिक्षकांच्या फेरीसाठी वापरल्या जातात त्यामुळे बदली पात्र एक नंतर प्रसिद्ध झालेल्या सुधारित रिक्त पदांच्या यादी तुम्हाला रिक्त जागा दिसतात.
बदली पात्र एक मध्ये रिक्त झालेल्या जागा या बदली पात्र एक मध्ये वापरल्या जात नाही त्या पुढील फेरीमध्ये वापरल्या जातात.
वरील विन्सेस ने प्रसिद्ध केलेली पीपीटी संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक.
ज्या शासन निर्णयानुसार उत्तरे दिली आहेत तो शासन निर्णय.👇
दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी चा जिल्हा अंतर्गत बदलीचा सुधारित धोरण ठरवणारा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments