बदली अपडेट - अवघड क्षेत्रातील राऊंड मधील 53 प्लस/संवर्ग एक शिक्षकांचा चेंडू आयुष प्रसाद यांच्या कोर्टात.
सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सदर ऑनलाईन बदली प्रकारचा शेवटचा टप्पा म्हणजे अवघड क्षेत्रात रिक्त असलेल्या जागा भरण्याचा.
त्यासाठी बदली पोर्टलवर अवघड क्षेत्रात रिक्त असलेल्या जागांबाबतची लिस्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर या क्षेत्रात ज्यांची बदली होणार आहे अशा शिक्षकांची देखील सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
परंतु सदर यादीमध्ये..
ज्यांचं वय 53 वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजेच ते संवर्ग एक मध्ये मोडतात परंतु त्यांनी सुरुवातीलाच बदलीसाठी नकार दर्शवलेला नाही अशा शिक्षकांची नावे आलेली आहेत.
त्याचबरोबर अशा काही शिक्षकांची नावे आलेली आहेत की ज्यांच्या सेवेची शेवटची एक किंवा दीड वर्ष किंवा कमीत कमी कालावधी उरलेला आहे आणि आता या राऊंडमध्ये त्यांना जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळेमध्ये बदली दिली जाणार आहे.
वरील व अधिक काही ज्या शिक्षकांची अपेक्षा नव्हती की आपली बदली यावर्षी या बदली प्रक्रियेमध्ये होईल अशा काही शिक्षकांची नावे या शेवटच्या अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या यादीमध्ये नावे आलेली आहेत.
असे सर्व शिक्षक व काही शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आज दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी बदली समितीचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आयुष्य प्रसाद यांना जाऊन भेटले.
व वरील समस्या त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. आपले तसे लेखी निवेदन देखील माननीय आयुष प्रसाद यांना त्यांनी सादर केले. आता सदर समस्यांवर बदली समितीचे अध्यक्ष माननीय आयुष्य प्रसाद हे काय निर्णय घेतात व पुढील बदली प्रक्रिया कशी पार पडते याची उत्सुकता जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये मध्ये असलेले शिक्षक यांना लागलेली आहे.
या अगोदर संवर्ग तीन मधील शिक्षकांना कंपल्सरी 30 ऑप्शन भरावे लागतील असा शासनादेश निर्गमित झाला होता 30 ऑप्शन भरल्याशिवाय किंवा उपलब्ध असलेल्या 30 पेक्षा कमी ऑप्शन भरल्याशिवाय अर्ज सबमिट देखील होऊ शकत नव्हता. परंतु माननीय आयुष्य प्रसाद यांना समस्या सांगितल्यानंतर त्यांनी त्यामध्ये बदल करायला लावून कमी ऑप्शन भरल्यानंतरही अर्ज सबमिट झाला होता.
वरील प्रमाणे बदली प्रक्रियेमध्ये काही बदल करण्याचे निर्देश माननीय प्रसाद देतात की ज्याप्रमाणे चालू आहे त्याचप्रमाणे बदली प्रक्रिया पार पडते हे येत्या एक-दोन दिवसात आपल्याला कळेल.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments