बदली अपडेट महत्त्वाचे..!

 बदली अपडेट महत्त्वाचे..!



◼️आता मिळणार बदलीची पुन्हा एक संधी..!


बदली पात्र शिक्षकांच्या पुढील प्रमाणे जिल्हा नुसार बदल्या झालेल्या आहेत.



◼️फक्त विस्थापित शिक्षकांसाठी(ज्यांच्या नावासमोर Tagged आणि जुन्याच शाळेचा Udise Code आहे..!


◼️Eligible Round -2 (विस्थापित फेरीत) गेलेल्या शिक्षकांना आता स्व-तालुक्यात शाळा मिळविण्याची मोठी संधी..



आज दि.६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी जिल्हा अंतर्गत ची संवर्ग ४ ची बदली यादी प्रकाशित झाली आहे. परंतु त्यात बदल असल्याने तिला अंतिम समजण्यात येऊ नये. सुधारित यादी १२ वाजता नंतर प्रकाशित केली जाणार आहे,अश्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत.


यादीचे पृथककरण(Analysis) केल्यास विस्थापित होण्याच्या भीतीने बऱ्याच शिक्षकांनी आपला स्व-तालुका सोडून बाहेरील तालुक्यातील शाळा निवडल्या आहेत आणि त्यांना त्या मिळाल्या आहेत. असे झाल्याने त्यांच्या स्व-तालुक्यातील बऱ्याच जागा रिक्त असल्याचे पाहायला मिळाले आहे.


आता पुढील Eligible Round २(विस्थापित) मध्ये अत्यंत कमी शिक्षक फॉर्म भरणार आहेत त्यामुळे शाळा निवडण्यासाठी जास्त पर्याय उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे आपल्याला चांगली किंवा आपल्या आवडीची शाळा मिळण्याची शक्यता १००% असणार आहे.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

2 Comments

  1. सगळा मुर्खांचा बाजार आहे.बदली वेळापत्रक चार वेळा बदलविले.बदली वेळापत्रक चार वेळेस बदलवूनही नियोजित वेळापत्रकानुसार बदल्या होवू शकल्या नाहीत. संवर्ग चार च्या झालेल्या बदल्यांची जाहीर करण्यात आलेल्या याद्या मागे घेण्याची नामुष्की शासनावर आली.म्हणे आज दुपारी बारा नंतर फेर याद्या जाहीर होतील. आता रात्रीचे साडे नऊ वाजले तरी याद्या दुरुस्ती होवून बाहेर पडल्या नाहीत. सकाळी जाहीर झालेल्या याद्यांमध्ये चुका होत्या. सगळा घोळ आहे.बदली सॉफ्टवेअर नापास झाले हेच सत्य आता शासनासह सर्वांनी स्विकारावे.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.