विस्थापित शिक्षकांना अर्ज करण्यासाठी लॉगिन सुरू झाले आहे.
लिंक 👇
पोर्टल वर लॉगिन करण्यासाठी लिंक वर टच करून आपला मोबाईल नंबर आलेला ओटीपी व कॅपच्या टाकून लॉगिन करा.
सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याची अपडेट झालेली रिक्त पदांची यादी आपल्याच लॉगिन मधून डाऊनलोड करा.
एकूण विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी करून त्यांची सेवाजेष्ठता लक्षात घेऊन आपल्या सेवाजेष्ठतेनुसार उपलब्ध असलेल्या रिक्त जागांचा प्राधान्यक्रम ठरवून घ्या.
व त्यानंतरच आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरून प्राधान्यक्रम सबमिट करावा.
प्राधान्यक्रम सबमिट करण्यासाठी कोणती घाई करू नये.
प्राधान्यक्रम भरल्यानंतर व्यवस्थित रित्या तो सेव झाला आहे की नाही त्याचा योग्य क्रम आहे की नाही हे काळजीपूर्वक पहा.
आजच प्राधान्यक्रम भरला पाहिजे असे नाही आपण प्राधान्यक्रम भरून सेव करून ठेवू शकता.
शासनाकडून विन्सइस कडून मिळालेल्या सूचनानुसार सदर सूचना व शासन निर्णय योग्यरीत्या समजून घेऊन आपला प्राधान्यक्रम सबमिट करावा.
विस्थापित शिक्षकांसाठी प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल वरील सध्याच्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोर्टल उपलब्ध असणार आहे अर्थात पोर्टल सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे ही तारीख वाढवून मिळण्याची शक्यता आहे.
शिक्षक बदली
ज्या शिक्षकांच्या बदली विषयक समस्या, तक्रार, आक्षेप असल्यास आपले सविस्तर निवेदन तालुका नोडल अधिकाय्रांमार्फत जिल्हा कार्यालय यवतमाळ यांचेकडे दि. १०/२/२०२३ पर्यंत पाठवावे.
शिक्षणाधिकारी
जि. प. यवतमाळ
वरील प्रमाणे सूचना शिक्षणाधिकारी यवतमाळ यांनी दिल्या आहेत.
🔖बदली अपडेट..!
दि. ०९/०२/२०२३ वेळ:- ११.२० मी
▶️बदली पात्र शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त.
◼️Eligible Round 2/विस्थापित संदर्भात महत्वपूर्ण..
◼️पती-पत्नी शिक्षकांना पुन्हा वन युनिट ची संधी. (जर बदली पात्र फेरीत पसंतिक्रम न मिळाल्यास/विस्थापित झालेले असल्यास)
बदली पात्र/संवर्ग-४ ची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.बदली पात्र शिक्षकांच्या बदली संदर्भात सुधारित यादी आज प्रकाशित होणे अपेक्षित आहे.
यादी प्राप्त झाल्यावर जर Status मध्ये आपल्या नावासमोर खालील Term दिसत असतील तर आपणास (Eligible Round 2) मध्ये फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे.खालील status असलेल्या शिक्षकांनी फॉर्म न भरल्यास System उपलब्ध असलेल्या जागेवर आपणास बदली देऊन टाकेल.
१)Tagged
२)Eligible
३)Not Transffered
टीप:- ही विस्थापित शिक्षकांची फेरी पूर्ण झाल्यावर जर अवघड क्षेत्रातील जागा शिल्लक राहत असल्यास सुगम क्षेत्रात १० वर्ष सेवा पूर्ण झालेले परंतु सदरील शाळेवर ५ वर्ष सेवा पूर्ण न झालेले शिक्षक यांची सेवा जेष्ठते प्रमाणे यादी लावली जाणार आहे व त्यांना तिथे पदस्थपणा दिली जाणार आहे.
आपल्या ब्लॉगवर दिलेली माहिती ही काही वेळा इतर शिक्षकांनी केलेले विश्लेषण असते ती योग्यच असेल असे नाही, आपण आपल्या जिल्ह्यातील बदली पोर्टल समन्वयकाशी संपर्क साधून माहितीची खात्री करून घेऊनच आपला अर्ज सबमिट करावा.
ब्लॉग वरील कोणतीही माहिती अंतिम समजू नये.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments