बदली पोर्टल महत्त्वाचे - पसंती प्राधान्यक्रम न भरता ही झालेली बदली शासन निर्णयानुसार आहे काय?

बदली पोर्टल महत्त्वाचे! 

पसंती प्राधान्यक्रम न भरता ही झालेली बदली शासन निर्णयानुसार आहे काय? 


ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील बदलीच पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धत.. 👇




दिनांक :- ०८/०२/२०२३ वेळ:- दुपारी ०२.१५ मी


(न्यायालयात जाण्यापूर्वी नक्की वाचा..)


बऱ्याच लोकांचे बदली संदर्भात फोन आले त्यावर माझे व्यक्तिगत मत पुराव्यासह...


प्रश्न:- आम्ही ,संवर्ग-४ मधून फॉर्म भरला आणि जागा न मिळाल्याने आम्ही विस्थापित झालो परंतु ज्यांनी संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरलाच नाही त्या लोकांची सुद्धा बदली झाली,पोर्टल ने त्यांना जागा दिली, आम्ही विस्थापित झालो हा आमच्या वर अन्याय नाही का..?

आम्ही न्यायालयात का दाद मागू नये...?


माझे मत👉 न्यायालयात दाद मागणे हा आपला व्यक्तिगत अधिकार आहे.परंतु ग्राम विकास विभाग यांचे शासन निर्णय दि ०७/०४/२०२१ नुसार बदली प्रक्रिया पार पडत आहे. या शासन आदेशातील मुद्दा क्रमांक ४.५ मध्ये बदली पात्र शिक्षकांची बदली कशी करावी ह्याची कार्यवाही दिलेली आहे. ह्याच मुद्द्यात ४.५.४ मध्ये जर एखाद्या शिक्षकांने संवर्ग-४(बदली पात्र शिक्षक) मध्ये बदली अर्ज भरलाच नाही तर त्याला पोर्टल संवर्ग-४ मध्ये इतर शिक्षकांसोबत बदली देऊन टाकले आणि त्यांची बदली ही पोर्टल वर उपलब्ध असलेल्या जागे नुसार असेल. (त्यामुळे आपले जर असे मत असेल की मी फॉर्म भरून विस्थापित झालो आणि त्यांनी फॉर्म न भरता पोर्टल ने जागा दिली तर हा मुद्दा शासन आदेशात आहे. असे स्पष्ट असतांना न्यायालय जावे का..? हे आपण ठरवावे.)


पुराव्यासाठी वर GR चा Screenshot आहे.


(वरील एका प्रश्नासाठी माझं मत आहे.)



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏






Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.