Badali Update - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची पुढील सत्रातील बदली प्रक्रिया ही 6 मार्च पासून सुरू होणार.

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची पुढील सत्रातील बदली प्रक्रिया ही 6 मार्चपासून सुरू होणार. 


पुढील बदली प्रक्रिया 6 मार्च पासून सुरू करणार.

 आयुष प्रसाद साहेब.. 

आता कोणत्याही प्रकारचा बदल नाही.


अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठीच्या सेवाजेष्ठता यादी संदर्भात आयुष प्रसाद साहेब यांना दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी भेटले असता त्यांनी वरील माहिती दिली.


प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टल द्वारे 2022 मधील प्रक्रिया सध्या सुरू आहे सदर प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आहे. चालू क्षेत्रातील बदली प्रक्रिया ही फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत पूर्ण होईल. 


व पुढील वर्षी साठीची बदली प्रक्रिया देखील लगेच मार्च महिन्यात सुरू होण्याचे संकेत आहे. 

सुप्रसिद्ध वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार शिक्षकांची नवीन बदली प्रक्रिया लगेच सुरु होणार असे समजते. 

चालू वर्षाच्या बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांना शाळेत तीन वर्ष पूर्ण झालेली नसल्यामुळे विनंती बदली अर्ज करता आली नव्हते. 

सदर बाबी विरोधात नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली असता संवर्ग एक व संवर्ग दोन साठी तीन वर्ष सेवेची अट रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

त्यामुळे पुढील बदली प्रक्रियेत संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांना जरी एका शाळेवर तीन वर्ष सेवा पूर्ण झालेली नसेल तरी देखील विनंती बदली अर्ज करता येणार आहे. 

सध्याची गती प्रक्रिया ही शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 च्या सुधारित धोरणानुसार पार पडत आहे. 

परंतु सदर धोरणामध्ये काही बदल होऊन नवीन शासन निर्णय निर्गमित होईल व त्यानुसार पुढील बदली प्रक्रिया राबविण्यात येईल अशी माहिती बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष माननीय  आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी काही संघटनेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या भेटीदरम्यान सदर माहिती दिली आहे. 

संवर्ग चार मधील विस्थापित झालेल्या शिक्षकांना बदली प्राधान्यक्रम करण्यासाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत कालावधी देण्यात आलेला होता व त्यानंतरचे दोन दिवस बदली पोर्टल सदर शिक्षकांच्या बदल्या करणार होते परंतु दोन दिवस पूर्ण होऊन देखील अद्याप संवर्ग चार मधील विस्थापित शिक्षकांच्या बदल्यांची यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.