शालार्थ वेतन महत्त्वाचे (सुधारित सूचना)
जानेवारी 2023 चे शालार्थ वेतन देयक करतांना खालील बाबी प्राधान्याने कराव्या.
📌 1)ज्या कर्मच्याऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची वेतनामधून नियमीत NPS कपात करण्यात यावी.
📌 2)माहे जानेवारी 2023 चे वेतनामध्ये महागाई भत्ता 38 % प्रमाणे शालार्थ प्रणाली मध्ये आपोआप येईल त्याबाबत खात्री करावी.
📌 3) ज्या शिक्षकांना माहे जानेवारी 23 ची वेतनवाढ देय असेल त्यांना वेतनवाढ लावूनच बिल तयार करण्यात यावे.
📌 4) प्राथमिक शिक्षक (लेखाशिर्ष 22020173) यांचे अनुदान अपुरे असल्यामुळे प्राथमिक शिक्षक वगळता केंद्रप्रमुख , हायस्कूल शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वित्त विभाग, शासन निर्णय क्र. मभावा-1322/प्र.क्र.17/सेवा-9 दिनांक 10-01-2023 नुसार महागाई भत्ता फरक 4% (34% वरून 38 %) प्रमाणे 6 महिनेकरीता (जुलै 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत) याप्रमाणे अचूक विवरण तयार करून फरकाची एकूण रक्कम Non Computational Dues and Deduction_Allowances या Path चा उपयोग करून DA Arrears या Tab मध्ये नोंदवावी.
📌 5) आंतरजिल्हा बदलीचे रुजू झालेल्या शिक्षक यांचे NPS खाते शिफ्टिंग झाल्याबाबत खात्री करूनच देयके फॉरवर्ड करावी.
📌 6) माहे जानेवारी 2023 च्या सर्व शिक्षक यांच्या वेतानातून ध्वज निधी 300 रु प्रमाणे कपात करण्यात यावी..
📌 7)प्रत्येक शिक्षक कर्मचारी यांचे वेतनाचा खाते क्रमांक व IFSC Code शालार्थ प्रणालीमध्ये अचूक नोंद असल्याची खात्री Bank Statement वरून करण्यात यावी. शालार्थ CMP टॅब वरून शिक्षकांचे खाते व्हेरिफाय करण्यात यावे. शालार्थ CMP प्रणाली द्वारे वेतन थेट शिक्षक यांच्या खात्यात वेतन होणार असल्याने सदर कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.
📌 8)जे शिक्षक/ शिक्षीका प्रसूती रजा ,बालसंगोपन रजा किंवा 30 दिवसाच्या वर असणाऱ्या कोणत्याही रजा या कालावधीत संबंधित शिक्षक यांना TA भत्ता आणि नक्षल/प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येऊ नये.तसेच जे शिक्षक दीर्घ अथवा अर्जित रजेवर आहे अश्या शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणाली मध्ये कपात करूनच देयके जनरेट करावे.
📌 9)Income tax TDS कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की बऱ्याच कर्मचाऱ्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी मध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्यावी.
📌 10)शालार्थ प्रणाली मध्ये झालेल्या नविन बदलानुसार आपण यापुर्वी Save केलेल्या Non Gevernment Deduction ( Credit Society , CO-Operative Bank , LIC , Other Deduction , Other Recovery & RD ) या कपाती त्या ठिकाणी यापुर्वी आपण नोंदविलेल्या आहेत त्या तशाच दिसतील परंतु त्यांना परत Save करावे. अशा पद्धतीने न केल्यास Aquitance Roll आणि Bank Statement मध्ये तफावत दिसेल.
📌 11)जिल्हा स्तरावरून DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून ( Excel file ) तपासून बरोबर असलेली देयकेच जिल्हा स्तरावर फॉरवर्ड करणेबाबत वारंवार सुचना देण्यात येऊनही काही पंचायत समिती देयके न तपासताच सादर करत असलेबाबतची बाब या कार्यालयाचे निदर्शनास आली आहे. तरी याद्वारे आपणास पुन:श्च सुचित करण्यात येते की, ऑनलाईन देयके पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून ( Excel file ) तपासून बरोबर असलेली देयकेच जिल्हा स्तरावर फॉरवर्ड करण्यात यावी.
📌 12)कोणत्याही परिस्थितीत online देयकात नियमीत वेतना व्यतिरीक्त इतर कोणतेही Arrears,DA बाबत थकबाकी आणि ब्रोकन पिरेड मधून वेतन देयक व प्रलंबीत वेतन जिल्हा कार्यालयाचे परवानगी शिवाय टाकण्यात येऊ नये.
📌13)Paybill Generate केल्यानंतर DDO 1 यांनी Inner Page तपासूनच देयक फॉरवर्ड करावे सर्व बदल योग्य झालेबाबत व Net Amount लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे.
📌 14)वारंवार सुचना देण्यात येऊनही काही पंचायत समिती देयके न तपासताच सादर करत असलेबाबतची बाब या कार्यालयाचे निदर्शनास आली आहे. त्यामुळे यानंतर त्रुटीची देयके कोणतीही पुर्व सुचना न देता जिल्हा कार्यालयाकडून Reject करण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
वरील दिलेल्या सुचनांचे पालन करूनच DDO 1 (मुख्याध्यापक) यांनी देयक शालार्थ प्रणाली मध्ये जनरेट करून दिनांक 21 जानेवारी 2023 सकाळी 11वाजे पर्यंत DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावीत.
DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून (Excel file)तपासून बरोबर असलेली देयके दिनांक 22 जानेवारी 2023 सकाळी 11वाजे पर्यंत DDO 3 (शिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी.
दिनांक 22 जानेवारी 2023 सकाळी 11 वाजे पर्यंत ज्यांची देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. विलंबाने प्राप्त होणाऱ्या पं.समिती / हायस्कूल चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत DDO- 1 व DDO- 2 यांची राहील.
उपरोक्त संदर्भीय पत्र क्र 3 मधील मुद्दा क्र 3 नुसार देयकाबाबत कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे प्रथम प्राधान्याने ज्यांचे देयक येईल त्यांचे वेतन होईल.
अत्यंत महत्त्वाची अतिरिक्त सूचना.
शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत सर्व शिक्षक यांचे खाते व्हेरिफाय केल्याबाबत प्रमाणपत्र लेखाशीर्ष निहाय अहवाल तात्काळ शिक्षण विभागात सादर करावा.
त्यासोबतच माहे सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत चे प्राथमिक शिक्षक यांचे शेड्युल अद्यापही ज्या पंचायत समितीने सादर केले नाही त्या त्वरित सादर करावे.
आदेशानव्ये
शिक्षणाधिकारी (प्राथ.)
जिल्हा परिषद, सर्व
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments