चटोपाध्याय मधील त्रुटी दूर बक्षी समिती खंड 2 मध्ये त्रुटी दूर करण्या साठी पिटीशन दाखल.

 चटोपाध्याय मधील त्रुटी दूर बक्षी समिती खंड 2 मध्ये त्रुटी दूर करण्या साठी पिटीशन दाखल.


उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी चटोपाध्याय म्हणजेच वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये मिळणारा लाभ संदर्भात असलेली त्रुटी बक्षी समितीच्या खंड दोन मध्ये दूर करावी असे रिट पिटीशन दाखल करून घेतली आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार प्राथमिक शिक्षक यांना बारा वर्षानंतर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी यामधील झालेला अन्याय म्हणजेच मिळणारी तुटपुंजी वेतन वाढ संदर्भात दाखल केलेल्या रिट पिटीशन दाखल करून घेतली आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार वरिष्ठ  वेतनश्रेणी लागू झाल्यानंतर मूळ पगारामध्ये 3400 वाढ होत होती व एकूण वाढ जवळपास पाच हजार रुपये पर्यंत होत होती. परंतु सातव्या वेतन आयोगात ती वाढायला पाहिजे होती प्रत्यक्षात मात्र कमी झाली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्री लागू झाल्यानंतर मूळ पगारात फक्त सातशे रुपये एवढी वाढ होते व एकूण पगारात फक्त जवळपास एक हजार रुपये एवढी वाढ होते. सदर वेतन त्रुटी दूर करण्यासंदर्भात वेळोवेळी शासनास निवेदने देण्यात आली परंतु शासनाने कोणतेही पाऊल उचलल्यामुळे न्यायालयाकडे दाद मागण्यात आली सदर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वरिष्ठ वेतनश्रेणीनुसार पगारामध्ये 22 टक्के वाढ करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत यासाठी बक्षी समितीचा खंड दोन प्रकाशित करण्यात येऊन योग्य तो निर्णय घेण्यासाठी व निर्देश देण्यासाठी  उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन दाखल करून घेतले आहे व पुढील तारीख दिली आहे. सदर उच्च न्यायालयाचा सूचना पुढीलप्रमाणे.





वरील चटपाध्याय वेतन श्रेणी संदर्भातील उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

3 Comments

  1. 10,20,30 बद्दल काय निर्आणय आहे पण.... तो पण अन्याय शिक्षकांवर झालेला आहेच ना....

    ReplyDelete
    Replies
    1. निकाल आला नाही अजून त्याचा

      Delete
  2. चटोपाध्याय वेतन त्रुटी संदर्भात सध्या चे अपडेट काय आहे?

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.