आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू!
आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश प्रक्रियेमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवलेल्या असतात. या पंचवीस टक्के जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर इयत्ता पहिलीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरावे लागतात. ज्या विद्यार्थ्यांचा या पंचवीस टक्के राखीव असलेल्या जागांमधून प्रवेश होतो त्यांची सदर इंग्रजी शाळेची फी शुल्क महाराष्ट्र शासन भरते.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया लागू असणाऱ्या शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया सोमवार (दि. २३) पासून सुरू करण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येतील. शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराअंतर्गत कोणत्याही प्रवर्गातील पालकांना आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
यंदा ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांना २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतरच पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. प्रक्रियेत प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आर टी इ 25 टक्के अर्ज कसा भरावा?
नवीन खासगी शाळांचा तीन वर्षांपर्यत ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत समावेश करू नये. या शाळांची शैक्षणिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतरच, त्यांचा समावेश प्रक्रियेत करण्यात यावा, असेही प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. पडताळणी यशस्वी झाल्यावर प्रवेश घेता येईल. तसेच शाळेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची पडताळणी होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.
अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा!
Https://Student.Maharashtra.Gov.In/Adm_portal/Users/Rteindex
0 Comments