प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी ध्वजारोहणापूर्वी हे करावेच लागेल शासन निर्णय..!!
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे दिनांक 22 जानेवारी 2020 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार दिनांक 26 जानेवारी 2020 पासून दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका याचे सामाजिक वाचन करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
भारताचे राज्यघटना दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधान दिनांक 26 जानेवारी 2050 पासून अमलात आले असून भारतीय संविधानाची पुरेशी माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलतत्त्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि त्याबरोबरच घटनेतील अन्याय स्वातंत्र्य समता व बंधुता ही मूलतत्वे समाजमनावर कोरली जावी त्यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मूलतत्वे संविधानिक हक्क आणि कर्तव्य स्वातंत्र्य भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी असून नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार सुजाण व संस्कृत नागरिक घडवण्यास मदत होईल.
त्यामुळे दिनांक 26 जानेवारी 2020 पासून दरवर्षी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका/ सरनामा/Preamble यांचे सामूहिक वाचन करण्यात यावे.
वरील प्रकारचे निर्देशक ग्रामविकास विभागाने सदर शासन निर्णयानुसार दिलेले आहेत.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments