पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मतदानासाठी मिळणार विशेष नैमित्तिक रजा शासन आदेश (विशेष नैमित्तिक रजा कोरा अर्ज पीडीएफ डाउनलोड)

 पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मतदानासाठी मिळणार विशेष नैमित्तिक रजा शासन आदेश. 

 (विशेष नैमित्तिक रजा कोरा अर्ज पीडीएफ डाउनलोड) 


मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयातून दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी निर्गमित आदेशानुसार दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2022 23 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

भारत निवडणूक आयोग दिनांक 29 डिसेंबर 2022 च्या प्रसिद्धीपत्रकांवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग व नाशिक विभाग या पदवीधर तसेच औरंगाबाद विभाग व नागपुर विभाग कोकण विभाग या शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे सदर निवडणुकीचे मतदान दिनांक 30 जानेवारी 2023 रोज सोमवारी सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत व मतमोजणी दिनांक 2 फेब्रुवारी 2023 गुरुवार रोजी होणार आहे. 

या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा देणे आवश्यक आहे या सदर्भातील राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 23जून 2011 च्या शासन निर्णयाची प्रत या सोबत पाठवण्यात येत आहे तसेच सदर शासन निर्णय ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे त्यानुसार निवडणुकीच्या मतदारांना मतदानाच्या दिवशी विशेष निर्मिती कडे जा मंजूर करण्यात यावी सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञ असलेल्या नियमितिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करून आपल्या स्तरावरून या बाबीस स्थानिक वृत्तपत्रे तसेच दूरदर्शन व आकाशवाणी इत्यादी प्रसार माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी अशा सूचना शुभ हा बोरकर अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी सदर परिपत्रक अन्वय दिल्या आहे. 


वरील आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी देखील सर्व विभाग प्रमुख यांना कर्मचाऱ्यांना दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी ची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणे बाबत आदेशित केले आहे. 



विशेष नैमित्तिक रजा कोरा अर्ज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.