बदली पात्र शिक्षक (संवर्ग 4) जिल्हा अंतर्गत बदली अपडेट!
➡️ सर्वसाधारण क्षेत्रातील विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक ज्यांनी सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष पूर्ण केलेली आहे व कार्यरत शाळेमध्ये पाच वर्षे झालेले आहेत त्यांनी बदलीस होकार दिला असेल तर त्यांच्या पसंतीक्रमाने त्यांना संवर्ग एकच्या टप्प्यात बदली मिळाली असेलच परंतु त्यांच्या पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास पुन्हा त्यांना बदली पात्र बदली टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्यास संधी मिळेल.
➡️ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल त्यापैकी एकाने आपल्या जोडीदाराजवळ जाण्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अर्ज केला असेल व कदाचित त्या शिक्षकाला पती-पत्नी अंतर्गत बदली मिळाली नसेल अशा परिस्थितीत आपला जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र बदली टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्याची संधी मिळेल व त्यांची बदली होईल.
➡️ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटरच्या आत असेल तर असे शिक्षक फक्त बदली पात्र शिक्षक बदली टप्प्यामध्ये एक युनिटचा लाभ घेऊ शकतात त्यापैकी एका बदली पात्र शिक्षकाने बदली पात्र टप्प्यांमध्ये पसंती क्रम देत असताना जर आपल्याला आपल्या जोडीदाराला सुद्धा सोबत बदलीने घ्यायचे असल्यास आपल्या जोडीदार शिक्षकाला शाळेवर तीन वर्ष झालेले असेल तर त्यांना सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊन दोघांनाही बदली पात्र टप्प्यामध्ये पसंती क्रम भरून एक युनिट चा लाभ घेऊ शकतात अशी सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
➡️ पती-पत्नी दोघांनाही एक युनिट म्हणून बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्येच लाभ घेऊ शकता परंतु या टप्प्यामध्ये जर दोघांनाही 30 किलोमीटरच्या परिसरात शाळा मिळाल्या नाही तर ते शिक्षक विस्थापित होऊन रँडम राऊंड मध्ये गेल्यानंतर त्यांना एक युनिटचा लाभ घेता येणार नाही अशा शिक्षकांना बदली देताना 30 किलो मीटरच्या परिसरात शाळा देणे बंधनकारक राहणार नाही त्यामुळे एक युनिटचा लाभ घेताना वरील बाबीचा विचार करावा.
➡️ बदली पात्र बदली टप्प्यामध्ये एक युनिट म्हणून दोन समान लिंग असणाऱ्या व्यक्ती एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाही.
➡️ प्राधान्यक्रम भरताना बदली पात्र शिक्षकांनी खालील लिंकला क्लिक करावे.
वरील लिंकला क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे.
➡️ सदर पोस्ट आपण इतर ग्रुप वर व मित्रमंडळ फॉरवर्ड करावी जेणेकरून त्यांनाही फायदा होईल.
➡️ सदर ही पोस्ट विन्सिन कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जीआर च्या आधारे तयार केलेली आहे या मताशी आपण सहमत असालच असं सांगता येणार नाही.
सस्नेह धन्यवाद!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments