संवर्ग 4 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून आज लवकरच याद्या प्राप्त होतील.
कोणत्या जिल्ह्यात किती संवर्ग 4 बदल्या झाल्
ते पुढील तक्त्यात आपल्याला दिसून येईल.
संवर्ग ०४ बदली यादी दुबार पाठवणात येणार आहे.
सर्व शिक्षकवृंदाना कळविण्यात येते की ,संवर्ग ०४ बदली यादी मध्ये प्रिंट मिस्टेक आसल्याचे व्हिंसीसद्वारे आताच कळविण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व याद्या दुपारी १२:०० नंतर दुबार पाठविण्यात येतील याची नोंद घ्यावी.
व्हिंसीस कडुन आलेला मॅसेज.
👇👇👇
टीप
यादीमध्ये छपाईची चूक आहे.कृपया यादी प्रकाशित करू नका आणि प्रकाशित झाल्यास मागे घ्या.
तेथे काही एक युनिट पती-पत्नीचे नाव चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केले जात आहे.
दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी ग्रामविकास विभागाने सुधारित जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे त्यानुसार संवर्ग चर्चा बदल्या पूर्ण करण्यासाठी पोर्टल ला दिनांक 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत वेळ देण्यात आला होता.
जर पोर्टलने जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया टप्पा क्रमांक चार म्हणजेच संवर्ग चार च्या बदल्या ची प्रक्रिया दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी पूर्ण केली असेल तर आज दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी पर्यंत संवर्ग चार मधील शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांची यादी प्रसिद्ध होऊ शकते.
सदर परिपत्रकानुसार संवर्ग चर्चा बदल्या पूर्ण झाल्यानंतर पुन्हा विस्थापित झालेल्या शिक्षकांसाठी बदली पोर्टलवर दिनांक सात फेब्रुवारी 2023 पासून शाळांचा प्राधान्यक्रम निवडण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्याआधी दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चे स्तरावरून रिक्त पदांची यादी जाहीर केली जाणार आहे.
बदली पोर्टल साठी जरी संवर्ग चार च्या बदल्या पूर्ण करण्यासाठी 3 फेब्रुवारी 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली होती तरी रिक्त पदांची यादी मात्र सहा फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर होणार आहे.
या अगोदरच्या वेळापत्रकानुसार ज्या दिवशी बदली प्रक्रिया पोर्टल पूर्ण करत होते त्याच्या दुसऱ्या दिवशी रिक्त पदांची यादी जाहीर होत होती व त्यानंतर लगेच प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येत होते.
परंतु सुधारित वेळापत्रक पोर्टलला बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 फेब्रुवारी 2023 पर्यंतचा वेळ देण्यात आला व मध्ये दोन दिवस वेळ देऊ त्यानंतर दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी रिक्त पदांची यादी जाहीर केली जाणार आहे.
यामुळे बदली प्रक्रिया अजून दोन दिवस वेळ घेईल की काय अशी शंका घेता येते.
जर पोर्टलने दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी बदली प्रक्रिया पूर्ण केली असेल तर आज मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधून संध्याकाळपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध होईल अन्यथा त्यासाठी देखील 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाट पाहावी लागेल.
जिल्हा अंतर्गत बदली चे सुधारित वेळापत्रक.
आज दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे.
दिनांक 23 जानेवारी 2022 च्या वेळापत्रकात सुधारणा करून आज ग्रामविकास विभागाने जिल्हा अंतर्गत बदलीचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निर्मित केले आहे.
यानुसार बदली पात्र शिक्षक संवर्गच्या
3 फेब्रुवारी 2023 पर्यंत बदली पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया पोर्टल राबवेल.
तर 6 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा रिक्त पदांची यादी प्रकाशित करतील.
संवर्ग चार मधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी मुदत असणार आहे.
विस्थापित शिक्षकांच्या बदल्या पोर्टल दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करेल.
13 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा रिक्त पदांची यादी जाहीर होईल.
सुगम क्षेत्रात सलग दहा वर्षे ज्यांची सेवा झालेली आहे अशा शिक्षकांची यादी दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर होईल.
अवघड क्षेत्रात राहिल्या रक्त जागा भरण्याचा राऊंड 18 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होईल.
तर अवघड क्षेत्रातील राहिलेल्या जागा भरण्यासाठी पोर्टल 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करेल.
आणि याच वेळापत्रकाप्रमाणे संपूर्ण बदली प्रक्रिया पूर्ण झाली असता दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी हे झालेल्या बदलांची आदेश पोर्टलवर प्रसिद्ध करतील.
वरील जिल्हा अंतर्गत बदली चे सुधारित वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments