Income Tax Update - आयकर विवरण पत्र जानेवारी 2023 च्या वेतन देयकासोबत सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी यांचे निर्देश

आयकर विवरण पत्र जानेवारी 2023 च्या वेतन देयकासोबत सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी यांचे निर्देश.


बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणाली अंतर्गत माहे जानेवारी 2023 चे देयक सादर तयार करण्यापूर्वी आयकर कपाती बाबत घ्यावयाच्या दक्षतांबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

माहे जुलै 2022 पासून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे नियमित वेतन हे ZPFMS प्रणालीमार्फत जिल्हास्तरावरून माननीय मुख्य लेखा वित्त अधिकारी यांचेकडून थेट शिक्षकांचे खातेवर वर्ग करण्यात येतात. या कार्यालयाच्या असे निर्दशनास आले आहे की बऱ्याच शिक्षकांचा संपूर्ण वर्षभरात दरमहा वेतना मधून कपात करावयाचा टीडीएस TDS कमी कपात केल्यामुळे वर्षाखरीच भरावयाचा आयकर हा त्यांचे माहे फेब्रुवारीची निव्वळ वेतनापेक्षा जास्त येतो. सद्यस्थितीत वेतन हे जिल्हास्तरावरून थेट कर्मचारी यांचे खाते मध्ये वर्ग होत असल्यामुळे माही फेब्रुवारी 2023 चे देखा सोबत प्रत्येक शिक्षकाचे आयकर विवरणपत्र देखा सोबत जोडावयाचे आहे. त्याशिवाय नाही फेब्रुवारी 2023 चे वेतन या स्तरावरून अदा करणे शक्य होणार नाही या अनुषंगाने शिक्षकांची माहिती 2023 चे देखा स विलंब होऊ नये व आकराची गणना करून संपूर्ण आयकर वेतना मधूनच वसूल करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून माहे जानेवारी 2023 चे वेतनापूर्वीच आकाराची गणना करण्यात यावी व शिक्षकास सन 2022 23 मध्ये भरावयाच्या एकूण आयकर हा शिक्षकांचे आर्थिक हित लक्षात घेता माहे जानेवारी 2023 व फेब्रुवारी 2023 या दोन महिन्यांमध्ये विभागून कपात करण्यात यावा.




वरील शिक्षणाधिकारी यांचे आयकर कपाती संदर्भातील आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


आपणास 2022 23 या आर्थिक वर्षात किती आयकर द्यावा लागेल याची गणना करण्यासाठी आयकर मोजण्यासाठी एक्सेल शीट डाउनलोड करण्यासाठी.. 

Income Tax Calculator Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.