HSC/SSC Exam 2023 Update - वर्ग बारावी व दहावीचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 2023 वेळापत्रक.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सर्व विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांना दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा वर्ग दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2023 च्या वेळापत्रक बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
या अगोदरच आपल्या ब्लॉगवर आपण इयत्ता बारावी व इयत्ता दहावीची बोर्डाची लेखी परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार असल्याबाबत अपडेट दिलेले आहेत.
परंतु त्यामध्ये तोंडी प्रात्यक्षिक श्रेणी आऊट ऑफ टर्न परीक्षा वेळापत्रक नव्हते.
सदर पत्रानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा ही दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 20 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान होणार आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच वर्ग दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन हे दिनांक 10 फब्रुवारी ते दिनांक एक मार्च 2023 यादरम्यान होणार आहे.
इयत्ता बारावीची माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
अधिकच्या सविस्तर तोंडी प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांनी कृपया आपल्या कनिष्ठ महाविद्यालय किंवा विद्यालयाशी संपर्क साधावा.
इयत्ता दहावी व बारावीच्या तोंडी प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बाबत वरील पत्र संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments