राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्याना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै, 2022 पासून सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय.
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णवेळ कर्मचाऱ्याना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
2. शासन असे आदेश देत आहे की, 1 जुलै, 2022 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 34 % वरुन 38% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ 1 जुलै, 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील थकबाकीसह जानेवारी, 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भतील विद्यमन तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
4. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खची टाकू न त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखाली ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा रक्कम खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा रक्कम खर्ची टाकण्यात यावा.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments