संवर्ग 3 साठी रीक्त जागा दाखविण्यात याव्यात.
या मागणीसाठी मा. आयुष प्रसाद, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे
यांच्याशी
गौतम कांबळे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
यांनी संपर्क साधला असता मा. आयुष प्रसाद साहेब यांनी पुढीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली. आदरणीय श्री आयुष प्रसाद साहेब यांनी आज स्पष्ट सांगितले की, बदली प्रक्रिया सुरू आहे व बदली प्रक्रिया सुरू असताना असा कोणताही बदल शक्य नाही.याच मुद्द्यावरून संवर्ग एक दोन चे शिक्षक न्यायालयात जाऊ शकतात. पुढील वर्षीची सन 2023-24 बदली प्रक्रिया 1 मार्च 2023 रोजी सुरू होत आहे.
त्यावेळी 2022-23 बदली प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनुभवांचा व सूचनांचा तसेच झालेल्या बदली प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास करून बदल कोणत्या बाबतीत करता येईल? याचा विचार केला जाणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी 2022-23 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण 20 फेब्रुवारी रोजी मिटींग घेऊन आलेल्या विनंती निवेदनावर चर्चा करून एकत्रितपणे सात /आठ मुद्द्याच्या अनुषंगाने शासन निर्णय व साॅफ्टवेअरमध्ये एकदाच बदल केला जाणार आहे.संवर्ग तीन साठी चार-पाच आमदारांची निवेदने आहेत परंतु संवर्ग चार साठी मोठ्या प्रमाणावर म्हणजे 40/50 आमदारांची निवेदन आहेत.
या लोकप्रतिनिधींची निवेदने तसेच कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे निवेदन, या सर्वांच्या निवेदनावर एकत्रितरीत्या विचार करून 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयामध्ये आवश्यक तो बदल करण्यात येणार आहे व या बदलानुसार.
पुढील वर्षीची 2023-2024 ची बदली प्रक्रिया 1 मार्च 2023 ते 31 मे 2023 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.
काळजी करू नये .
सदैव शिक्षक बांधवांच्या हितासाठी कार्यरत ....
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ.
शब्दांकन ...
मा .विठ्ठल सावंत
राज्यमहासचिव
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
2 Comments
Great
ReplyDeleteThank you🙏
Delete