बदली अपडेट - निव्वळ रिक्त जागा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना मिळणे बाबत ग्रामविकास विभागाची पत्र

 बदली अपडेट - निव्वळ रिक्त जागा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना मिळणे बाबत ग्रामविकास विभागाची पत्र.

आज दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांचा जिल्हा अंतर्गत बदलासाठी सुधारित धोरण अंतर्गत बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षकांना विनंती बदलीसाठी अर्ज करताना निवळ रिक्त पदे व बदली पात्र शिक्षकांची पदे दर्शविण्याबाबत श्री आयुष प्रसाद (भा प्र से) अध्यक्ष जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गट तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वय सुधारित धोरण विहित करण्यात आले असून त्यातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची कार्यवाही सुरू आहे. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्य क्रमानुसार केला जातील अशी तरतूद गुप्त दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयात आहे. बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षकांना विनंती बदलीसाठी अर्ज करताना निवळ रिक्त पदे व बदली पात्र शिक्षकांची पदे दर्शविण्यात यावी अशा आशयाची मागणीची पत्र व निवेदने शासनास प्राप्त झालेली आहे. 

१) श्री सुधीर मुनगंटीवार माननीय मंत्री वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय, 

२) डॉ. परिणय फुके, विधानपरिषद सदस्य, 

३)श्री विनोद अग्रवाल विधानसभा सदस्य, 

४)श्री विजय रहांगडाले विधानसभा सदस्य, 

५)महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा नंदुरबार, 

६)शिक्षक सहकार संघटना, जिल्हा गोंदिया, 

सदर निवेदनात नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने आपले अभिप्राय आजच शासनास उपलब्ध करून द्यावे ही विनंती जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांची कार्यवाही सुरू असल्यामुळे विलंब टाळावा. 

वरील आशयाचे पत्र ग्रामविकास विभागाने अध्यक्ष जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गट तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना दिले आहे. 




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.