विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांच्या वैद्यकीय तपासणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करणेबाबत शिक्षणाधिकारी यांचे आदेश.
शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांनी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक कर्मचारी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत बदलांची शासन निर्णयान्वय सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे सदरची सण 2022 मधील बदली प्रक्रिया शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली टी टी एम एस वर सुरू असून शासन स्तरावरून प्राप्त सूचनानुसार बदली पात्र बदली अधिकार प्राप्त विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मधून अर्ज करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी सादर केलेल्या वैद्यकीय व अपंगत्व प्रमाणपत्राची तालुकास्तरावर गठीत समितीकडून पडताळणी करण्यात आलेली आहे तरीदेखील तालुका स्तरावरून प्राप्त अहवाल वैद्यकीय अपंगत्व प्रमाणपत्र पुनर पडताळणी जिल्हास्तरावरून करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार जिल्हा परिषदेने तयार केलेल्या यादीतील विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मध्ये विविध आजारांचा दावा करणाऱ्या शिक्षक पाल्य जोडीदार यांचे वैद्यकीय तपासणी बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता सिविल हॉस्पिटल नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती व वेळेवर उपस्थित राहून केस पेपर काढून जिल्हा रुग्णालय नाशिक यांचेकडून तपासणी बाबत निर्देश प्राप्त करून त्यानुसार वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. असे निर्देश यादीतील एकूण हृदय शस्त्रक्रिया 69 आणि इतर आजार 108 व्यक्तींनी तपासणीसाठी त्यांच्याकडील सध्याच्या व यापूर्वीच्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे प्रमाणपत्रे वैद्यकीय अहवाल तसेच ऑनलाइन बदली अर्ज साक्षांकित केलेल्या दोन प्रतीसह समक्ष उपस्थित राहणे बाबत निर्देश शिक्षणाधिकारी प्राथमिक नाशिक यांनी दिले आहेत.
वरील शिक्षणाधिकारी यांचे आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments