विषय शिक्षकांना वर्ग सहावी ते आठवी वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे संदर्भात शिक्षण संचालनालयाचे पत्र.

 विषय शिक्षकांना वर्ग सहावी ते आठवी वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे संदर्भात शिक्षण संचालनालयाचे पत्र.


शिक्षण संचालनालयातून निर्गमित दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार राज्यातील उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गावर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरिता समिती गठित करण्याबाबत सदर समितीने अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

दिनांक 27 जून 2022 च्या शासन निर्णयान्वये सन 2019 च्या चौथ्या हिवाळी अधिवेशनामध्ये उच्च प्राथमिक म्हणजेच वर्ग सहावी ते आठवीच्या वर्गावर नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने विधानपरिषद नियम 93 अन्वय सूचना उपस्थित करण्यात आली होती सदर सूचनेवरील चर्चेदरम्यान तत्कालीन माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी सूचनेमध्ये उपस्थित विषयाच्या अनुषंगाने आयुक्त स्तरावर समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने राज्यातील उच्च प्राथमिक वर्ग सहावी ते आठवीच्या वर्गावर नियुक्त पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

सदर समिती समोर माहिती मागविण्याचे निश्चित करण्यात आले असून सदर माहिती सादर करणे विषयी शिक्षण आयुक्त यांनी निर्देश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या वर्ग सहावी ते आठवी करिता एकूण मंजूर पदसंख्या.

मंजूर पदावर पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या शिक्षकांची संख्या.

पदवीधर शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या परंतु पदवीधर वेतन श्रेणीमध्ये वेतन घेत नसलेल्या शिक्षकांची संख्या.

संबंधित पात्र शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देयक केल्यास वाढणारा वार्षिक आर्थिक भार.

उर्वरित रिक्त पदावर पदवीधर वेतनश्रेणी करता पात्र असणाऱ्या शिक्षकांची संख्या.

सदर शिक्षकांची पदवीधर वेतनश्रेणी तयार केल्यास त्याबाबतचा वार्षिक आर्थिक भार.

सर्व वर्ग सहावी ते आठवी वरील शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू केल्यास एकूण आर्थिक भार.

वरील प्रमाणे माहिती खाजगी माध्यमिक व या व्यवस्थापनाची स्वतंत्ररीत्या व अचूक माहिती माननीय आयुक्त शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 9 डिसेंबर 2022 पर्यंत संचालनालय तातडीने सादर करावी असे निर्देश माननीय देविदास कुलाळ शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व वेतन अधीक्षकांना दिले आहेत.



वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.