शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणे बाबत शासन निर्णय

 शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणे बाबत शासन निर्णय. 


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

दिनांक 17 नोव्हेंबर 2022 च्या परिपत्रकांमुळे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सन 2021 22 या वर्षाचे कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. परंतु अद्याप 20% PAR स्वयं मूल्य निर्धारण प्रतिवेदन पुनर्विलोकन या टप्प्यावर प्रलंबित आहेत असे दिसून येते. 

महापार मध्ये कार्य मूल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विशेषता नव्याने महापार मध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सदर मुदतवाढ अंतिम असेल. 

महापार मध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन 2021 22 या वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी महापार प्रणाली बंद करण्यात येतील महापार मध्ये समाविष्ट नसलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत सण 2021 22 वर्षाचे कार्य मूल्यमापन अहवाल दिनांक 15 जानेवारी 2023 पर्यंत अंतिम करण्यात यावेत. 

वर नमूद केलेल्या वेळेत ही सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी संस्करण अधिकारी यांची राहील. 





वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.