डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना - 2022.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत राबवली जाणारी सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना 2022.
मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या प्रवर्गांमधील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
अंतिम मुदत दिनांक 31 डिसेंबर 2022.
मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न रुपये आठ लक्ष पर्यंत आहे व जे विद्यार्थी पदवी प्राप्त असून पदव्युत्तर शिक्षणासाठी आयआयटी अथवा तत्सम 200 शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्राप्त आहेत अशा विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना 2022 सुरू करण्यात आलेली आहे.
सोबत दोनशे विविध शैक्षणिक संस्थांची यादी दिली आहे. यामध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला असल्यास विहित नमुन्यामध्ये अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन व हार्ड कॉपी सह अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत सारथी संस्थेच्या कार्यालयामध्ये सादर करायचा आहे.
या शिष्यवृत्ती योजनेमध्ये 300 विद्यार्थ्यांची निवड करून शिक्षणाचा संपूर्ण खर्च सारथी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
या शिष्यवृत्ती योजनेची अंतिम मुदत दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याबाबतची माहिती पाठविणे आवश्यक आहे.
सदर शिष्यवृत्तीचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज तसेच ज्या 200 संस्थांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे अशा संस्थांची यादी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर टच करा.
https://admin.sarthi-maharashtragov.in/auth/login
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments