शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणे बाबत शासन निर्णय

 शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणे बाबत शासन निर्णय. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 26 फेब्रुवारी 2014 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून मुख्याध्यापकांना योजनेच्या कामातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी योजनेच्या कामकाजावर महाराष्ट्र राज्यातील काही मुख्याध्यापक संघटनांनी दिनांक 16 ऑगस्ट 2013 पासून बहिष्कार टाकलेला होता या अनुषंगाने विविध संघटनांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांचे सोबत बैठक घेऊन योजनेच्या अंमलबजावणी मध्ये काय सुधारणा करणे आवश्यक आहे याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले नंतर बहिष्कार मागे घेण्यात आला होता यानुसार शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांची समिती स्थापन करून विचार विनिमय करण्यात आला.

त्यानुसार पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी बचत गटाची निवड शाळा व्यवस्थापन समितीने करावी तर स्वयंपाकी मदतनीस यांची निवड संबंधित बचत गटाने करावी मालाची मागणी नोंदवणे म** तपासून ताब्यात घेणे व मालाच्या नोंदी घेणे ही कामे बचत गटांनी करावी बचत गटांनी नोंदवलेली मागणी बरोबर असल्याचे मुख्याध्यापक प्रमाणित करतील त्यामुळे मागणीची अचूकता कायम राहील.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये धान्यसाठा सुस्थितीत व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी बचत गटाची राहील तसेच धान्याचा हिशोब बचत गटाने ठेवावा मुख्याध्यापकांनी धान्यसाठा आणि इतर हिशोबाची अभिलेखे महिन्यातून दोन वेळा तपासावेत व गटशिक्षणाधिकाऱ्याकडे याबाबतचा अहवाल गोपनीय रित्या सादर करावा.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये रोज किती मुले जेवली आहारात काय मेनू होतात याची नोंद मुख्याध्यापक स्वतंत्र ठेवतील निकृष्ट दर्जाचा आहाराचा पुरवठा झाल्यास अथवा विश्वात झाल्यास शिल्लक माल व नोंदणी नुसार आवश्यक माल यामध्ये तफावत आढळल्यास बचत गटावर कार्यवाही करण्याबाबतची शिफारस मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयास करावी यानुसार बचत गटावर आहार शिजवणाऱ्या यंत्रणेवर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने योग्य ती कार्यवाही करावी.

शालेय पोषण आहार योजनेची काम केवळ मुख्याध्यापकांनी न पाहता शाळेतील शिक्षकांनी दिवसानुसार वाटून घेतल्यास मुख्याध्यापकावर योजनेचा ताण येणार नाही त्यामुळे सर्व शिक्षकांनी योजनेमध्ये सहभागी राहतील. 

आहाराची चव प्रथम आहार तयार करणारा स्वयंपाकि नंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किंवा त्यांची प्रतिनिधी व त्यानंतर मुख्याध्यापक किंवा योजनेची संबंधित शिक्षक या तीन स्तरावर घेऊन त्याची नोंदव नोंदवही मध्ये घेण्यात यावी प्रत्येक स्तरावर दक्षता घेतल्यास दुर्घटना संभवणार नाही. 

शालेय पोषण आहारामधून विषबादीचा प्रकार घडल्यास संबंधित बचत गटाला जबाबदार धरण्यात येईल याबाबत मुख्याध्यापकाला जबाबदार न धरता चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा. 

अन्न शिजवणे स्वयंपाकाची भांडी ताटांची साफसफाई व भोजनानंतर शाळेच्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी बचत गट आहार शिजवणाऱ्या यंत्रणेची राहील. 

प्राथमिक आरोग्य केंद्र स्थानिक रुग्णालय रुग्णवाहिका अग्निशमन यंत्रणा यांचे दूरध्वनी क्रमांक शाळेमध्ये तसेच बचत गटांनी ठेवावे. 




शालेय पोषण आहार योजनेबाबत वरील संपूर्ण शासनादेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.