भविष्य निर्वाह निधी काढण्याची प्रक्रिया

 भविष्य निर्वाह निधी काढण्याची प्रक्रिया

  • सेवानिवृत्तीनंतर किंवा दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिल्यानंतर भविष्य निर्वाह निधी (EPF) ची म्हणजेच पीएफ (Provident Fund) ची रक्कम काढता येते. याशिवाय लग्न, मेडिकल इमर्जन्सी किंवा अशा काही समस्याही घरात उद्भवतात जेव्हा अचानक पैशाची गरज भासते. अशा परिस्थितीत पीएफचे पैसे तुमच्या कामी येऊ शकतात. तुम्हाला तुमची पीएफ रक्कम खात्यात ट्रान्सफर करायची असेल तर तुम्ही हे काम घरी बसून सहज पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही अटी पूर्ण कराव्या लागतील.




  • https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/

  •  येथे यूएएन पोर्टलला भेट द्या
  • तुमचा यूएएन आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि पडताळणीसाठी कॅप्चा टाका.

  • आता 'ऑनलाइन सेवा' टॅबवर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून 'क्लेम (फॉर्म-३१, १९ आणि १०सी)' पर्याय निवडा.

  • पुढील स्क्रीनवर, तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि 'पडताळणी' वर क्लिक करा.

  • आता 'Yes' वर क्लिक करा आणि पुढे जा. यानंतर, ‘प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम’ वर क्लिक करा.

  • आता क्लेम फॉर्ममध्ये, 'मला अर्ज करायचा आहे' या टॅब अंतर्गत तुम्हाला आवश्यक असलेला दावा निवडा.

  • तुमचा निधी काढण्यासाठी 'पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म ३१)' निवडा. नंतर उद्देश, आवश्यक रक्कम आणि कर्मचार्‍यांचा पत्ता प्रदान करा.

  • आता, प्रमाणपत्रावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

  • तुम्ही ज्या उद्देशाने फॉर्म भरला आहे त्यासाठी तुम्हाला स्कॅन केलेली कागदपत्रे सबमिट करण्यास सांगितले जाऊ शकते.

  • नियोक्त्याने पैसे काढण्याची विनंती मंजूर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे मिळतील. बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी साधारणपणे १५-२० दिवस लागतात.


EPFO मधून पैसे काढण्याच्या अटी
ईपीएफओ (EPFO) मधून संपूर्ण पैसे फक्त दोन अटींवर काढता येतात. पहिली अट म्हणजे तुम्ही सेवानिवृत्त असायला हवे. तर दुसरी अट म्हणजे तुम्ही बेरोजगार आहात. ईपीएफओ 55 वर्षांपेक्षा जास्त वय हे निवृत्तीचे वय मानते. निवृत्तीच्या एक वर्षापूर्वी तुम्हाला फक्त 90 टक्के रक्कम काढण्याची परवानगी असेल. एका महिन्याच्या बेरोजगारीनंतरही तुम्ही फक्त 75 टक्के रक्कम काढू शकता. नवीन रोजगार मिळाल्यावर थकबाकीची रक्कम तुमच्या नवीन EPF खात्यात हस्तांतरित केली जाईल.

कर्मचारी 5 वर्षे सतत सेवेत असेल तर तो बांधकाम किंवा घर खरेदीसाठी रक्कम काढू शकतो. तर गृहकर्जासाठी कर्मचारी किमान 3 वर्षे सेवेत असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तो 90 टक्के रक्कम काढू शकतो. लग्नासारख्या गरजांसाठी कर्मचाऱ्याने 7 वर्षे सेवेत असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तो त्याच्या ठेवीपैकी 50 टक्के रक्कम काढू शकतो. वैद्यकीय उपचारांसाठी कोणतीही अट नाही.

हे आवश्यक
पैसे काढण्यासाठी तुम्ही तुमच्या EPF खात्याशी UAN आणि आधार लिंक करून ऑनलाइन दावा करू शकता. यासाठी तुमच्याकडे सक्रिय UAN नंबर, UAN शी लिंक केलेले बँक खाते आणि PAN आणि आधारशी संबंधित माहिती असली पाहिजे. ही माहिती EPF खात्याशी जोडलेली असावी.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.