या संवर्गातील शिक्षकांना मिळणार बदली पोर्टलवर पुन्हा प्राधान्यक्रम भरण्याची संधी...
Online Teacher Transfer Portal Update - savarg 1 2 3 Madhil Badali Patra Shikshakanna Milanar Punha Pradhanyakram Denechi Sandhi!
संवर्ग एक मध्ये ऑनलाईन अर्ज करताना म्हणजेच प्राधान्यक्रम भरताना विन्स इस आयटी प्रायव्हेट लिमिटेड कडून मिळालेल्या सूचनानुसार.
संवर्धन एक चे अर्ज भरताना विन्सेस कडून मिळालेल्या सूचना.
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यांनी ऑनलाईन बदली पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर जर त्यांना त्यांच्या प्राधान्य क्रमामधील शाळा मिळाली नाही व संवर्ग एक मधील जे शिक्षक बदली पात्र आहेत अशा शिक्षकांना पुन्हा संवर्ग चार मधून ऑनलाईन बदली पोर्टलवर प्राधान्यक्रम देता येणार आहे.
परंतु जे शिक्षक संवर्ग एक मध्ये आहेत परंतु बदली पात्र नाहीत म्हणजेच त्यांना एका शाळेवर पाच वर्षे पूर्ण व जिल्ह्यातील एकूण सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली नाही अशा शिक्षकांना मात्र ही संधी मिळू शकणार नाही. त्यांना जर संवर्ग एक मधील प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर त्यांना त्याच मूळच्या सध्या कार्यरत शाळेत राहावे लागेल.
अर्थात हीच बाब सर्व बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजेच संवर्ग एक, संवर्ग दोन व संवर्ग तीन मधील शिक्षकांना लागू राहिली.
याचाच अर्थ असा होतो की जे शिक्षक बदली पात्र आहेत आणि तेच संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन मध्ये आहेत अशा शिक्षकांना विशेष संवर्गातून म्हणजेच एक-दोन-तीन या संवर्गातून देखील बदली प्राधान्यक्रम भरता येणार आहे व शेवटच्या म्हणजेच संवर्ग 4 मधून देखील जर त्यांना विशेष संवर्ग एक दोन तीन मधून त्यांच्या पसंतीचे गाव मिळाले नाही तर बदली प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
खात्री करण्यासाठी लॉगिन उपलब्ध असल्यास ऑनलाइन टीचर ट्रान्सफर पोर्टल वर जाऊन जर तुम्ही बदलीपात्र आहात म्हणजेच एका शाळेवर पाच वर्ष व संपूर्ण सेवा दहा वर्ष अशा दोन्ही अटी पूर्ण करत आहात व तुम्ही संवर्ग एक संवर्ग दोन व संवर्ग तीन यापैकी एका संवर्गाचा लाभ घेत आहात तर बदली पोर्टलवर लॉगिन केल्यास त्यामधील इंटर डिस्ट्रिक्ट वर क्लिक केल्यास तुम्हाला प्राधान्यक्रम भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ संवर्ग एक साठी ते समोर एक मधून देखील प्राधान्यक्रम देऊ शकतात व बदली पात्र म्हणजेच इलिजिबल या कॅटेगरी मधून देखील आपण आपल्या शाळांचा प्राधान्यक्रम देऊ शकता.
29 डिसेंबर - संवर्ग 1 बदली प्रक्रिया पूर्ण झाले नंतर रिक्त शाळांच्या याद्या घोषित केल्या जाणे अपेक्षित होते.
30 डिसेंबर - 30 डिसेंबर पासून संवर्ग 2 मधील शिक्षकांना पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित आहे.
वरील प्रक्रिया आज दिनांक 30 डिसेंबर रोजी पूर्ण न झाल्यास ग्रामविकास विभागाकडून नवीन वेळापत्रक येण्याची शक्यता आहे.
जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन.
पोर्टलवर लॉगिन सुरू झालेले आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments