इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या आयोजनासाठी यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्राबाबत..

 इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या आयोजनासाठी यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्राबाबत....

                         


 वरील विषयान्वये इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांचे निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येणार आहे, सदर सर्वेक्षण कसे करावे, सर्वेक्षण साधन (Tool) रचना, मूल्यांकन रुब्रिक रचना, श्रेणींची नोंद विद्यार्थी कृती-कार्यक्रम यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत शिक्षकांसाठी दिनांक २० डिसेंबर  २०२२ रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता ते ०१:०० या कालावधीत यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात येत आहे.  


या सत्रासाठी इयत्ता दुसरी ते पाचवीला अध्यापन करणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी खालील यु-ट्युब लिंकवर ऑनलाईन उपस्थित राहण्यास सूचित करावे. 


काही शिक्षकांना काही कारणास्तव या सत्रास उपस्थित राहणे शक्य न झाल्यास खालील यू ट्यूब लिंकवर ते आपल्या सोयीनुसार सत्र पाहू शकतात. 


तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक), शिक्षण विस्ताराधिकारी (सर्व), केंद्रप्रमुख (सर्व), BRC विषय साधन व्यक्ती व विशेष साधन व्यक्ती यांनी सुद्धा उपस्थित रहावे. 




यु-ट्युब लिंक

https://youtu.be/6lyAaYrI1fw


प्रति,

१) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),

२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई,

३)शिक्षणाधिकारी, प्राथमिक / जि.प. (सर्व),

४)शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई,

५)प्रशासनाधिकारी, मनपा/नपा, (सर्व).

 

( राजेश पाटील ) भा.प्र.से

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.