केंद्रप्रमुख पदाची शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता पात्रता निश्चित करणारी अधिसूचना ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या 10 जून 2014 च्या अधिसूचनेनुसार केंद्रप्रमुख पदासाठी पुढील प्रमाणे अहर्ता निश्चित केली आहे.
सरळ सेवा भरतीसाठी.
केंद्रप्रमुख पदासाठी ची पात्रता ही 50% गुणासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व बी एड यासोबतच अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा तीन वर्षाचा अनुभव असावा.
मर्यादित विभागीय परीक्षेद्वारा भरतीसाठी.
जिल्हा परिषद मधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक मधून विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पात्रता 50% गुणासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व बीएड व अध्यापन अथवा प्रशासनाचा तीन वर्षाचा अनुभव.
केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीसाठी.
जिल्हा परिषद मधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक मधून सेवाजेष्ठतेने पदोन्नती.
विषानुसार भरतीचे प्रमाण हे 40 30 30 यामध्ये भाषा विषयासाठी 40% गणित व विज्ञान विषयासाठी 30 टक्के तर सामाजिक शास्त्र विषयासाठी 30 टक्के अशाप्रमाणे भरती होईल.
वरील संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments