केंद्रप्रमुख भरती अपडेट - केंद्रप्रमुखांची पदे 50% पदोन्नती व 50 टक्के विभागीय परीक्षे द्वारे भरणे बाबत दिनांक एक डिसेंबर 2022 रोजी चा शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा भागाने दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची पदे 50% पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा द्वारे भरण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
केंद्रप्रमुख भरती बाबत यापूर्वी पारित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक 16 फेब्रुवारी 2018 अतिक्रमित करण्यात येऊन प्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहे.
केंद्रप्रमुखांची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती राजीनामा बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदांवर ती पदे जसजशी रिक्त होतील तसतशी 50% पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादित भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांच्या संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखांची पदे निश्चित करावीत.
केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादित परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल.
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा द्वारे केंद्र मुखांच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत चे आयोजन शासन निश्चित करेल अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येतील सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील या चाचणी परीक्षेचे आयोजन स्वरूप पुढीलप्रमाणे.
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
ऑनलाइन परीक्षा घेताना समान काठीण्य पातळीच्या पातळीच्या किमान दहा प्रश्नपत्रिका संच सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवील परीक्षार्थींना समान कठीण्य पातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
वरील आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments