बदली ब्रेकिंग - संवर्ग एक मधील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी म्हणजेच शाळांचा प्राधान्यक्रम निवडण्यासाठी बदली पोर्टल सुरू.
शिक्षकांना लॉगिन करण्यासाठी व संवर्ग एक मधील शिक्षकांना शाळांचा बदली प्राधान्यक्रम भरण्यासाठी म्हणजेच बदली अर्ज करण्यासाठी आज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सदर सुविधा दिनांक 21 डिसेंबर 2022 पासून दिनांक 24 डिसेंबर 2022 पर्यंत पोर्टलवर उपलब्ध असणार आहे.
बदली पोर्टलवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
बदली पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर आपण बदली पात्र शिक्षकांची यादी पाहू शकता.
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी होऊ शकतात.
विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांची यादी देखील पाहू शकतो.
व संवर्ग दोन मधील शिक्षकांची यादी देखील पाहता येते.
सर्व जिल्ह्यांच्या अद्यावत याद्या आता पोर्टलवर उपलब्ध झाल्या आहे.
✳️ संवर्ग 1 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम कसा भरावा.
👇
✳️ संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहे.
✳️ जर आपण बदली पात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहील.
✳️ परंतु आपण बदली पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल अन्यथा आपण विस्थापित होऊ शकता.
✳️विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा
➡️ वरील लिंक वर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकून टाकावा त्याखालील कॅपच्या टाकून पोर्टल लॉगिन करावे
➡️ स्क्रीनवर आलेले declaration स्विकारून डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे.
➡️ त्यातील application form वर क्लिक करावे.
➡️ त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर application type व action असे दोन ऑप्शन दिसतील.
➡️ Cadre 1 च्या समोर view application चा tab दिसेल application tab वर क्लिक केले की,
➡️ Cadre 1 application form स्क्रीनवर दिसेल त्यावर,
शिक्षकाचे नाव,
आडनाव,
शाळेचा यु डायस नंबर,
शिक्षकाचा शालार्थ आयडी,
ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही.
➡️ त्याखाली मला बदलीतून सूट हवी आहे असा प्रश्न दिसेल व* *त्याखाली आपला संवर्ग एक मधील प्रकार दिसेल.
वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही.
➡️ त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल.
पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर.
➡️ खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल.
➡️ याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम आपण निवडू शकता.
➡️ प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down मधून शाळा निवडावी.
➡️ शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील*
किती मंजूर पदे,
किती कार्यरत पदे,
शाळेतील रिक्त पदे,
समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे,
बदली पात्र शिक्षकांची पदे,
ह्या सर्व संख्या दिसतील.
➡️ Add tab वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्य क्रमामध्ये ऍड केली जाईलजाईल.
➡️ आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे.
➡️ या ठिकाणी संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा संभाव्य रिक्त जागा म्हणून दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रमांमध्ये दाखवल्या जातील.
➡️ Add केलेली प्रत्येक शाळा save या tab वर क्लिक करून save करावी.
➡️ आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल.
➡️ अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना add preferences वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save करावी.
➡️ अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही.
➡️ यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
➡️ वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनपर आहे प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.
विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांनी बदली अर्ज करताना शाळांचा प्राधान्यक्रम कसा भरावा यासाठी व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन पुढील प्रमाणे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments