आयकर कायद्यानुसार बचत कशी करावी? बचत करा आयकर वाचवा.
सेक्शन 24 B :- गृह कर्ज व्याज यात येते तिची मर्यादा जास्तीत जास्त दोन लाख रुपये पर्यंत आहे.
सेक्शन 80 B :- या सेक्शन ची मर्यादा जास्तीत जास्त एक लक्ष 50 हजार रुपये आहे त्यामध्ये खालील प्रकारच्या बचती मान्य केल्या जातात.
1)सर्व प्रकारची विमा पॉलिसी हप्ते.
2) जीपीएफ (पीएफ)
3) एन एस सी.
4)गृहकर्जातील मुद्दल रक्कम.
5) पी पी एफ.
6) शैक्षणिक फी (दोन मुलांपर्यंत)
7) टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड
8) सुकन्या योजना.
9) नवीन घर खरेदी स्टॅम्प ड्युटी.
10) बँक डिपॉझिट पाच वर्षाकरिता लॉक.
सेक्शन 80 D :- मेडिकल सुविधा साठीचा विमा रुपये 25 हजार पर्यंतची बचत माफ तसेच ज्येष्ठ नागरिक यांचा विमा असल्यास 25000 वेगळा खर्च माप मिळतो.
सेक्शन 80 E :- आपली पाल्य उच्च शिक्षण घेत असल्यास जर शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास त्याचे व्याज माफ आहे.
सेक्शन 80 G :-
कोणत्याही शासकीय योजनेत आपण देणगी दिली असेल तर पूर्णपणे माप आहे परंतु जर अशासकीय संस्था यांना देणगी दिली तर मात्र देणगी च्या 50% रक्कम माफ मिळते.
शासकीय देणगी देण्याआधी ती संस्था ८०जी नुसार मान्यता प्राप्त आहे का? त्याच्या पावतीवर तसा उल्लेख आहे का? पावतीवर संस्थेचा पॅन नंबर आहे का? आणि आताच्या नवीन नियमानुसार ती संस्था आपल्या ऑनलाईन चे सर्टिफिकेट देणार आहे का? या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या अन्यथा आपल्याला लाभ मिळणार नाही.
सेक्शन 80 EEB :- आपण जर इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले असल्यास त्यासाठी कर्ज घेतल्या असल्यास त्या कर्जाची व्याज या सेक्शनमध्ये माफ आहे.
सेक्शन 80 U :- जर कर्मचारी अपंग असेल व त्याची अपंगत्व 80 टक्के तर त्या व्यक्तीला 75 हजार रुपये पर्यंत व जर 80% पेक्षा जास्त अपंग असेल तर एक लक्ष 25 हजार रुपये पर्यंत माफ आहे. ही सुविधा घेण्या अगोदर यामधील अधिकची माहिती अवश्य घ्यावी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
2 Comments
ज्याला आपण 80 B सेक्शन म्हणत आहेत , माझ्या माहिती प्रमाणे त्याला 80 C सेक्शन म्हणतात.
ReplyDeleteOk
Delete