सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये दिनांक 26 डिसेंबर रोजी 'वीर बाल दिवस' साजरा करणे बाबत शासन आदेश.

 सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये दिनांक 26 डिसेंबर रोजी 'वीर बाल दिवस' साजरा करणे बाबत शासन आदेश. 


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी शिक्षण आयुक्त यांना दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात 26 डिसेंबरला सर्व शाळा महाविद्यालय आणि शासकीय स्तरावर वीर बाल दिवस साजरा करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

भारत सरकारच्या दिनांक 9 जानेवारी 2022 च्या राजपत्रानुसार

 दहावे शीख गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांचे बलिदानी पुत्र जोरावर सिंह आणि फत्ते सिंह यांचे नऊ वर्ष आणि सहा वर्ष वयाचे असताना शीख संप्रदायाचा सन्मान अस्मिता हेतू आणि रक्षणार्थ 25 डिसेंबर सतराशे पाच रोजी या दोन वीर पुत्रांनी सर्वोच्च बलिदान दिले त्यांच्या गौरवार्थ 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करावा असे भारत सरकारने निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन समाजातील विविध घटकांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी 19 डिसेंबर पासून ते 26 डिसेंबर च्या दरम्यान विविध ठिकाणी वीर बाल दिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे वीर बाल दिवसानिमित्त महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी गुरुपुत्र श्री जोरावर सिंह आणि श्री फतेसिंह यांची बलिदानाची गाथा सांगितली जावी. 

सदर पत्रामध्ये दिलेल्या सूचनानुसार राज्यातील शाळांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात यावेत असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. 




वीर बाल दिवसा संदर्भात शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.