बदली पोर्टल अपडेट - विशेष संवर्ग भाग एक अर्ज भरताना उद्भवलेल्या अडचणी व त्याचे स्पष्टीकरण

बदली पोर्टल अपडेट - विशेष संवर्ग भाग एक अर्ज भरताना उद्भवलेल्या अडचणी व त्याचे स्पष्टीकरण.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर सध्या दिनांक 21 डिसेंबर 2022 ते २४ डिसेंबर 2022 दरम्यान विशेष संवर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या बदली अर्ज संदर्भात शाळांचा प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया सुरू आहे.



जर आपण प्राधान्यक्रम निवडून अर्ज सादर केला असेल आणि त्यामध्ये प्राधान्यक्रम चुकला असेल किंवा इतर काही चूक झाली असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

अर्ज विथड्रॉ (WITHDRAW) करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. अगोदर भरलेला अर्ज आपण विथड्रॉ करून परत अचूक अर्ज भरून तो सबमिट करू शकता.


विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांना अर्ज भरताना निर्माण झालेल्या काही समस्या.


विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांनी होकार दर्शवलेला आहे त्यामुळे त्यांना आता पोर्टलवर शाळांचा पसंती क्रम नोंदवायचा आहे. पसंतीक्रम नोंदवताना एकूण 30 शाळांची निवड करू शकता. परंतु सगळ्यात शाळांची निवड केलीच पाहिजे असे नाही. एका शाळेची निवड करून देखील आपण अर्ज सबमिट करू शकता.


बऱ्याच शिक्षकांचा असा प्रश्न आहे की, 

आम्ही विशेष संवर्ग भाग एक मधून बदली साठी होकार दर्शविला आहे. परंतु तालुक्यामध्ये किंवा सोयीची एकही शाळा पोर्टलवर उपलब्ध नाही आम्ही काय करावे? 


या अगोदरच संवर्ग एक मधून अर्ज भरण्यासाठी होकार किंवा नकार दर्शवण्यासाठी संधी मिळाली होती त्या संधीतून आपण होकार दर्शवल्यामुळे आपल्याला आता आपल्या शाळेवरून दुसऱ्या शाळेवर जाण्यासाठी दुसऱ्या शाळांची प्राधान्य कामाची यादी निवडायची आहे.

जरी सोयीची शाळा मिळत नसली तरी त्यातल्या त्यात सोयीची एक किंवा दोन शाळा निवडून अर्ज सबमिट करावा लागेल.

जर अर्ज सबमिट केला नाही तर आपण बदली पात्र असाल किंवा जिल्ह्यामध्ये एकूण सेवा दहा वर्ष व एका शाळेवर तीन वर्ष सेवा झालेली असेल तर आपण सर्वात शेवटच्या राऊंडमध्ये अवघड क्षेत्रातील शाळा रिकामी राहिल्यास तेथे आपली बदली होण्याची शक्यता आहे.


जर बदली करायचीच नसेल तरीही जी शाळा आपल्याला मिळणार नाही अशी एक शाळा निवडून अर्ज सबमिट केला तर आपण जेथे आहात तिथेच राहाल आपली बदली होणार नाही. परंतु आपण अर्ज भरून बदलीसाठी संधी घेतल्यामुळे व पोर्टलमध्ये आपली नोंद संवर्ग एक मधील शिक्षक अशी झाल्यामुळे आपली रँडम राऊंड मधून अवघड शाळा मिळण्याचे टळेल. 

वरील एक शाळा निवडताना ती शाळा मिळाल्यास ती शाळा त्यातल्या त्यात सोयीची असेल अशी निवडावी. 


वरील समस्या का निर्माण झाली? 

संवर्ग एक मधील शिक्षकांना निव्वळ रिक्त पद पोर्टलवर दिसत नाही. 

संवर्ग तीन मधील म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची पद देखील दिसत नाही कारण जर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना सोयीची जागा नाही मिळाली तर ते त्यांच्याच म्हणजेच त्यांच्याच शाळेत राहणार आहे. 

फक्त बदली पात्र शिक्षकांची जे शिक्षक संवर्ग चार मध्ये मोडतात अशाच शिक्षकांची जागा संवर्ग एक मधील शिक्षक मागू शकतात. अशा शिक्षकांमधील बऱ्याच शिक्षकांनी संवर्ग एक चा लाभ घेऊन नकार दर्शविलेला आहे त्यामुळे त्यांची जागा देखील संवर्ग एक साठी उपलब्ध नाही. 

वरील कारणांमुळे संवर्ग एक मधील शिक्षकांना त्यांच्या सोयीची शाळा मिळणे कठीण झाले आहे. 

वरील माहिती आपल्या माहितीसाठी आहे. व आम्हाला समजली तशी आहे. आपण अधिकच्या माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील बदली संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता व खात्री करून आपला अर्ज सबमिट करू शकता. 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.