काल ग्रामविकासमंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने ग्रामविकास मंत्रालय मुंबई येथे मा. अच्युत इप्पर साहेब (कक्ष अधिकारी) यांची भेट घेवून बदलीसह विविध प्रश्नांवर सुमारे ३.५ तास सकारात्मक चर्चा करण्यात आली.
१) संवर्ग १ ते संवर्ग ३ बदली प्रक्रियेत बदली मागताना अशा र्मचाऱ्यांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागाच मागता येणार आहे, यात सर्वात मोठा अन्याय संवर्ग ३ वर होणार आहे, कारण संवर्ग १ व २ यांनी बदली प्रक्रियेत मागितल्यानंतर बदलीपात्र जागांपैकी उरलेल्या जागाच मिळणार मागता येणार आहेत. त्यांना तालुक्यात रिक्त जागा शिल्लक असताना बदली पात्र शिल्लक नसल्यास शेवटच्या विस्थापित राऊंडला किंवा तालुका बाहेर जाण्याची वेळ येणार आहे याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबत ग्राम विकास विभागाने बदली प्रक्रिया अधिक सुस्पष्ट करावी मात्र आता बदली प्रक्रिया सुरू झाल्याने बदली प्रक्रिया थांबवणे व फेरबल करणे सर्वस्वी निर्णय *मा.ग्रामविकास मंत्री महोदय* घेतील. पण याविषयी काय करता येईल याबाबत मंत्रालय स्तरावर योग्य ती चर्चा करून निश्चित कार्यवाही करणार आहेत.
२) शिक्षण संवर्गातील बदल्या करताना सदरील शासन निर्णय अनेक प्रकारचे बदल करणे भविष्यासाठी उचित ठरतील,त्यात जिल्ह्याची १० वर्षे सेवेची अट वगळून, फक्त विद्यमान शाळेतील किमान ५ वर्षे सेवा व इतर संवर्गासाठी ३ वर्षे सेवेची अट धरणे योग्य ठरेल अशी विनंती केली असता,त्याबाबत पुढील वर्षीच्या बदली धोरणात निश्चितच वरील प्रमाणे अंतर्भाव केला जाणार आहे.
३) १ डिसेंबरच्या २०२२ केंद्रप्रमुख भरती बाबतच्या शासन निर्णयानुसार ५० टक्के पदे ही पदोन्नतीने तर ५० टक्के पदे ही विभागीय परीक्षा पद्धतीने भरली जाणार आहेत. सदरील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ५.१ नुसार प्रशिक्षित पदवीधर बाबतची व्याख्या अधिक सुस्पष्ट करणे आवश्यक आहे. असे मत मांडताना सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षित पदवीधर ही व्याख्या स्पष्ट करताना शिक्षण सेवकाचा तीन वर्षाचा कालावधी वगळता बीए/बीएससी/बीकॉम यासह डीएड किंवा बीएड अशी व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षित पदवीधर समजण्यात यावे असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे, तीच व्याख्या योग्य असून त्याप्रमाणे आपल्या स्तरावरून सर्व जिल्हा परिषदांना स्पष्टपणे निर्देश देण्यात यावेत. अशी विनंती केली असता त्याबाबत देखील लवकरात लवकर शुद्धिपत्रक काढणार आहोत. म्हणजे सर्वांनाच विभागीय परिक्षा देता येईल.
४) आंतरजिल्हा बदलीने बदली झालेल्या शिक्षकांची आपसी सेवा जेष्ठता ग्राह्य धरणेबाबत सदरील सेवाज्येष्ठता ही बदली प्रक्रिया व पदोन्नती प्रक्रिया दोन्हीसाठी सरसकट ग्राह्य देण्यात यावी अशी विनंती केली असता, याबाबत साहेबांच्या मतानुसार मा. उच्च न्यायालयाचे वरील सेवाज्येष्ठता ग्राह्य धरणेबाबतच्या विविध याचिकेत निर्णय देतांना भिन्न प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे एका निकालात सरसकट सेवाज्येष्ठता ग्रहाय धरावी असे म्हटलेले आहे, तर दुसऱ्या निकालात बदली व पदोन्नतीसाठी अशा दोन प्रकारच्या सेवाजेष्ठता यादी तयार करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, एका निर्णयात शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने, ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार सद्यस्थितीत जिल्हा परिषदांची बदली पोर्टल मध्ये जी स्थिती आहे ती स्थिती जैसे थे ठेवण्याबाबत सुचित केलेले आहे, म्हणजेच काही जिल्हा परिषदेमध्ये जर बदली पोर्टल मध्ये आपसी सेवा जेष्ठता धरली असेल तर ती कायम ठेवावी तर काही जिल्हा परिषदेमध्ये आपली सेवाजेष्ठता धरली नसेल तर तशीच ठेवावी, भविष्यात या निर्णयासाठी कोर्टाच्या अंतिम आदेशानुसार पुढील योग्य ती कारवाई ग्रामविकास विभाग करणार आहे त्याबाबत देखील आपला पाठपुरावा सुरू राहणार आहे.
पदोन्नती प्रक्रियेसाठी मात्र आपल्या मूळ सेवा पुस्तकात दोन्ही आपसी बदली करणाऱ्या कर्मचाऱ्यंपैकी कमी जुनीअर कर्मचा-यांची नियुक्ती दिनांक ग्राह्य धरावी ही प्रक्रिया सद्यस्थितीत करता येईल.
आपलाच -संदीप जगन्नाथ पाटील
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments