व्हॉट्सॲप कम्युनिटी उपलब्ध
कम्युनिटी आणि ग्रुपमध्ये फरक काय ?
व्हाट्सअप ची नवीन काही फीचर्स..
व्हॉट्सॲप कम्युनिटी म्हणजे काय? कम्युनिटी आणि ग्रुपमध्ये फरक काय ?
मित्रांनो, व्हॉट्सॲपने गेल्या काही दिवसात त्यांची नवी सोय WhatsApp Communities उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्ही २० ग्रुप्स एकत्र करून एक कम्युनिटी बनवू शकता. या कम्युनिटीचा वापर अनेक ग्रुप एकत्र करून त्यांचं नियंत्रण करणं यासाठी होऊ शकेल. शाळा, परिसर, कामाच्या ठिकाणी ही सोय उपयोगी पडेल. ग्रुप्समध्ये आणि कम्युनिटीमध्ये घोषणा/Announcements जाहीर करण्यासाठी वापर करता येईल.
अनेकांना ही सोय ग्रुप प्रमाणेच वाटत असल्याचं सोशल मीडियावर सांगितल्याने व्हॉट्सॲपने स्वतः याबद्दल एक ट्विटकरून माहिती दिली आहे ही दोन्हीमध्ये नेमका काय फरक असणार आहे.
◆ व्हॉट्सॲप ग्रुप्स (WhatsApp Group)
एका ग्रुपमध्ये अनेकजण संभाषणासाठी सहभागी होऊ शकतात
मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शाळेतील विद्यार्थी, ऑफिसमधील कर्मचारी यांचा स्वतंत्र ग्रुप असू शकतो.
सध्या एका ग्रुपमध्ये ५१२ जण सहभागी होऊ शकतात. लवकरच ही मर्यादा १०२४ करण्यात येईल!
◆ व्हॉट्सॲप कम्युनिटी (WhatsApp Community)
एका कम्युनिटीमध्ये अनेक ग्रुप्स असतील
आता जर तुमचा शाळेचा ग्रुप असेल तर प्रत्येक वर्गाचा स्वतंत्र ग्रुप असतो. त्यासाठी शाळेची कम्युनिटी आणि वर्गांचे ग्रुप्स त्यामध्ये जोडता येतील.
सध्या एका कम्युनिटीमध्ये २० ग्रुप्स एकत्र जोडता येतात.
कम्युनिटी अनेक ग्रुप्सना एकत्र आणण्यासाठी तयार करू शकता.
◆ Communities ची उदाहरणे..
शाळेचं उदाहरण घ्यायचं तर शाळेतले ९अ, ९ब, ९क, १०अ, १०ब, १०क असे सहा वर्ग असतील तर त्या त्या वर्गांचे सहा ग्रुप असतील ज्यामध्ये त्या त्या वर्गांची माहिती/अपडेट्स मिळतात. पण जर तुम्हाला सर्व ग्रुप्समध्ये एकच सूचना पाठवायची असेल तर त्यासाठी तुम्ही कम्युनिटीचा वापर करू शकता. या कम्युनिटीला शाळेचं नाव देऊन त्यामध्ये वरील सहा ग्रुप जोडायचे.
असाच वापर आपल्या अपार्टमेंटमध्ये Wing असतात त्यांचा स्वतंत्र ग्रुप असेल तर त्यांची पूर्ण एक कम्युनिटी बनवून सर्वांना एकतर सूचना देता येतील.
ऑफिसेसमध्येही अशाच प्रकारे त्या त्या विभागाचे स्वतंत्र ग्रुप करून त्यांची एक कम्युनिटी करायची आणि मग सर्वाना एकत्र सांगायच्या सूचना कम्युनिटीमध्ये आणि स्वतंत्र विभागाच्या सूचना ग्रुपमध्ये सांगता येतील जेणेकरून संबंध नसलेल्या लोकांना इतर विभागाच्या ग्रुपचे मेसेज येणार नाहीत.
या सोबत व्हॉट्सॲपने अलीकडे इतरही बऱ्याच सोयी जोडल्या आहेत उदा.
व्हिडिओ कॉलमध्ये आता ३२ जण सहभागी होऊ शकतात
ग्रुपमध्ये १०२४ जण सहभागी होऊ शकतील.
चॅटमध्ये मत जाणून घेण्यासाठी Poll घेण्याचाही पर्याय येतोय
2GB पर्यंत साईजची फाइल पाठवता येणार
Admin ला सदस्यांचेही मेसेज डिलिट करता येतील.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments