महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक चार एप्रिल 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरीता या विभागाचे दि.२३.११.२०२२ रोजीचे पत्र रद्द करुन, शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्र.३ येथील दि.२.४.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये आपणांस कळविण्यात आले आहे.
२. उपरोक्त दि.२.४.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी प्रथमतः विनंती अर्ज सादर करण्याकरीता विद्यमान शाळेतील ३ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही.
उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याकरीता तात्काळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी व त्याप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याची आपणांस विनंती आहे.
आपली,
(नीला रानडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
वरील आदेशानुसार जर शिक्षक संवर्ग एक किंवा दोन चा प्रथम लाभ घेत असेल तर त्याला एका शाळेवर तीन वर्ष पूर्ण करण्याची अट लागू राहणार नाही!
विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत ग्रामविकास विभागाचा दिनांक 2 एप्रिल 2025 चा आदेश पुढीलप्रमाणे.
१) शासन परिपत्रक क्र. जिपब-४८१९/प्र.क्र.१९६/आस्था-१४, दि.२१.२.२०१९
२) शासन पत्र क्र. जिपब-२०२२/प्र.क्र.२९/आस्था-१४, दि.२३.११.२०२२
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत या विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये दिलेल्या सूचना रद्द करण्यात येत आहेत. तसेच ग्राम विकास विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरीता या विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम आहेत.
आपली,
(नीला रानडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत :- मे. विन्सीस आयटी सव्हिसेस प्रा.लि., पुणे.
जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली बाबत विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन मध्ये मोडत असलेल्या शिक्षकांना सध्या कार्यरत शाळेतील सेवेच्या अटीबाबत माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत ग्रामविकास विभागाला अर्ज केला असता ग्राम विकास विभागाने पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.
दि.०८.०३.२०२५ रोजीचा ऑनलाईन प्रणालीवर सादर करण्यात आलेला माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळणेबाबतचा अर्ज या कार्यासनात दि. ११.०३.२०२५ रोजी प्राप्त झाला आहे. आपल्या सदर अर्जान्वये प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात (१८ जून २०२४) ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी संवर्ग १ व संवर्ग २ या दोन बदली संवर्गाचा यापूर्वी कधीही लाभ घेतला नाही, अशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विद्यमान शाळेमध्ये जी सेवा निश्चित धरावयाची आहे, यासंदर्भात उपलब्ध शासन निर्णयाची प्रत मिळण्याबाबत विनंती केली आहे.
२. याबाबत आपणांस कळविण्यात येते की, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. तसेच जिल्हांतर्गत बदली करीता विशेष संवर्ग १ व विशेष २ अंतर्गत बदलीकरीता अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेतील सेवेबाबत या विभागाच्या दि.२३.११.२०२२ रोजीच्या पत्रान्वये सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या आहेत. (सदर पत्राची प्रत सोबत जोडली आहे.)
३. सदर माहितीने आपले समाधान न झाल्यास पत्र मिळाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत अपिलीय अधिकारी, श्रीमती नीला रानडे, उप सचिव (आस्था-१४), ग्रामविकास विभाग, पहिला मजला, ए विंग, बांधकाम भवन, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांचेकडे अपील दाखल करता येईल.
आपली,
(ज्योत्स्ना अर्जुन)
जन माहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन
संदर्भीय शासन निर्णय👇
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांच्या शाळेवरील सेवेबद्दल स्पष्टीकरण देणारा ग्रामविकास विभागाचा दिनांक 23 नोव्हेंबर 2022 चा शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व दोन यांना विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वय सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यातून प्रथमच विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेत किती वर्षे सेवा पूर्ण झालेली आवश्यक आहे याबाबत खालील प्रमाणे अधिक स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. अशी स्पष्ट तरतूद दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयात नमूद आहे. तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बदली संदर्भातील महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार प्रचलित रित्या एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षाचा असेल. अशी तरतूद आहे तसेच सदर नेमणुकीचा पदावली पूर्ण केला असल्याखेरीज त्याची बदली करण्यात येणार नाही. असेही सदर अधिनियमात स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार सात एप्रिल 2021 रोजी च्या शासन निर्णयातील तरतूद विचारात घेता विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी अशा शिक्षकांची विद्यमान शाळेत तीन वर्ष सलग सेवा पूर्ण व्हावी. याकरिता सन 2022 मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बद्री प्रक्रियेसाठी ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत दिनांक 30 जून 2022 पर्यंत तीन वर्षे सलग सेवा झालेली आहे. असेच शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सदर बाब आपल्या अधिनिस्त सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना सदर शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments