जिल्हाअंतर्गत बदली करिता विशेष संवर्ग 1 मधून अर्ज करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची मूळ कागदपत्र पडताळणी करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश

 जिल्हाअंतर्गत बदली करिता विशेष संवर्ग 1 मधून अर्ज करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची मूळ कागदपत्र पडताळणी करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश.


मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना जिल्हाअंतर्गत बदली करता विशेष संवर्ग भाग एक मधून अर्ज करण्यास प्राथमिक शिक्षकांची कागदपत्र पडताळणीकरिता नमूद गठीत समिती करून मूळ कागदपत्र पडताळणी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 4.2.8 विशेष संवर्ग भाग एक मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकार्‍याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबतची संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल असे देखील सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. सबब उपरोक्त प्रमाणे प्राथमिक शिक्षक संवर्गातील विशेष संवर्ग भाग एक मधून अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत आपल्या पंचायत समितीमध्ये समिती गठीत करून निर्णय घेण्यात यावा करिता पुढील कार्यवाहीस्तव रवाना.


बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विशेष संवर्ग भाग एक मधून अर्ज करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जाची व त्या संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी तालुकास्तरीय समिती ने करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित केले होते.




वरील आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.