शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शाळा संलग्नता शुल्क भरले जाणार जिल्हा परिषद/महानगरपालिका सेस फंडातून.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांचे पत्र.
आज दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी 2023 साठी महानगरपालिका व जिल्हा परिषद तेच फंडातून शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी परीक्षा शुल्क भरणे बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षा 2023 साठी विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्यास सुरुवात होणार असल्यामुळे ज्या व्यवस्थापनांना त्यांच्या आधीच शाळांमधील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या व शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क प्रवेश परीक्षा तसेच सहभागी होणाऱ्या शाळांचे शाळा संलग्नता शुल्क भरणा महानगरपालिका अथवा जिल्हा परिषद सहित फंडातून करावयाचा आहे त्यांनी उचित मान्यता घेऊन तसे परीक्षा परिषदेच्या ईमेल आयडीवर तात्काळ कळवावे.
शासन निर्णय दिनांक 11 नोव्हेंबर 2021 नुसार इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी साठी परीक्षा शुल्क.
सर्वांसाठी प्रवेश शुल्क 50 ₹
परीक्षा शुल्क 150 ₹ सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी
परीक्षा शुल्क 75 ₹ मागासव दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
सर्व शाळांसाठी शाळा संलग्नता शुल्क - 200
शिष्यवृत्ती परीक्षा 2023 साठीची अधिसूचना लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने सदर बाबत तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना परीक्षा परिषदेच्या आयुक्त यांनी शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका, शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व, शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम व उत्तर मुंबई, तसेच प्रशासन अधिकारी महानगरपालिका सर्व यांना दिल्या आहेत
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments