समानीकरण व अनिवार्य रिक्त जागा Compulsory Vacancy बाबत ग्रामविकास विभागाचा शासन आदेश.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत चिन्हांकित केलेल्या अनिवार्य रिक्त जागांवर पदस्थापना देण्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या संगणकीय प्रणाली द्वारे करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे असे करताना प्राधान्याने जिल्हा परिषदेत शिक्षकांची रिक्त पदे विचारात घेऊन त्या संख्येएवढ्या रिक्त जागा ह्या अनिवार्य रिक्त जागा कंपल्सरी व्हेकन्सीज म्हणून चिन्हांकित करण्याबाबत वरील धोरणात्मक निर्णयात नमूद केले आहे. शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करताना जिल्ह्यात असणारी रिक्त पदांची संख्या बदलत नसल्याने सदर रिक्त पदे ही जिल्ह्यातील शाळांमध्ये समानपणे रिक्त ठेवल्याने उपलब्ध शिक्षकांच्या नियुक्त्या संतुलितपणे होऊन जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारा शिक्षक वर्ग समानपणे वाटप होण्यास मदत होते. यामुळे जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनिवार्य रिक्त जागा जाहीर करणे, सदर शासन निर्णयान्वये बंधनकारक केलेले आहे. अशाप्रकारे अनिवार्य रिक्त जागा म्हणून जाहीर केलेल्या पदांवर शिक्षकांना पदस्थापना देता येणार नाही.
या संदर्भात काही जिल्हा परिषदांमध्ये अनिवार्य रिक्त जागा चिन्हांकित करताना शंका आहे. तसेच या संदर्भात शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांची कार्यवाही पूर्ण झाल्यावर या अनिवार्य रिक्त जागांवर नेमकेपणाने नियुक्ती देण्याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे सदर विषयाबाबत पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
समानीकरण हे तत्व विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी स्वीकारणे गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत यामध्ये तडजोड करता येणार नाही यास तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समानीकरणासाठी प्रत्येक वर्षी अनिवार्य रिक्त जागा ठेवून त्या चिन्हांकित कराव्या अशा अनिवार्य रिक्त जागा चिन्हांकित केल्यानंतर त्यामध्ये शासनाच्या परवानगीशिवाय बदल करता येणार नाही. तथापि शिक्षकांची नवीन भरती अथवा खाजगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इत्यादी कारणामुळे जर नवीन शिक्षक जिल्हा परिषदांमध्ये येत असतील तरच समानकरणासाठी चिन्हांकित केलेल्या अनिवार्यिक्त जागांमध्ये शासनाच्या परवानगीने बदल करण्याची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावी.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार करून शासनाच्या निर्णयाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संपूर्ण जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची तालुका निहाय व शाळा निहाय समान वाटप होईल याची दक्षता घ्यावी.
अनिवार्य रिक्त जागा चिन्हांकित करताना त्या काळजीपूर्वक कराव्यात त्यामध्ये चुका राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
संगणकीय प्रणालीद्वारे चिन्हांकित केलेल्या अनिवार्य रिक्त जागा संगणकीय प्रणालीवर ब्लॉक कराव्यात.
भविष्यात जिल्ह्यामध्ये नवीन शिक्षकांची नियुक्ती अथवा प्रतिनियुक्ती झाल्याशिवाय सदरच्या जागा या संगणकीय प्रणालीवर खुल्या केला जाणार नाहीत याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
सदर अनिवार्य रिक्त जागांवर शालार्थ मधून वेतन निघणार नाही याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांची राहील.
वरील ग्रामविकास विभागाचा समानीकरणासंबंधात व अनिवार्य रिक्त जागा संदर्भात शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments