राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022 23 च्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे परिपत्रक.
दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजीच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या परिपत्रका अन्वय राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022 23 च्या आयोजनाबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व नवपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपकामाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार यावर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2022 23 चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.
1) पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका व पर्यावेक्षिका.
2) प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक.
3) माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक.
4) विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती विषय सहाय्यक विषय साधन व्यक्ती समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपालगट.
5) अध्यापकाचार्य व पर्यावेक्षकीय अधिकारी केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता.
तसेच ही स्पर्धा पहिल्या टप्प्यात गट एक व तीन यासाठी जिल्हा व गट चार व पाच साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण स्तरावर घेण्यात येणार आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभागी घेण्यासाठी व्हाट्सअप वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी यासाठी प्राचार्य डायट व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. आपल्या स्तरावरून देखील सोबत दिलेल्या माहितीपत्रकाचे वाचन करून राज्यस्तरीय नमकम स्पर्धेविषयी आपल्या कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करावे व या स्पर्धेची जबाबदारी एक सक्षम अधिकाऱ्याकडे देण्यात येऊन नवप्रेमी स्पर्धेची माहिती पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास ई-मेलद्वारे कळविण्यात यावा.
त्यानुसार आपल्या अधिनिस्त अधिकारी शिक्षक अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना...
https://scertmaha.ac.in/innovation/
वरील लिंक वर दिनांक 2 नोव्हेंबर 2022 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आपले नव उपक्रम अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे.
वरील प्रमाणे दिनांक 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत नवोपक्रम अहवाल सादर करायचे आहेत.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेबाबतचे विद्या परिषदेचे परिपत्रक व माहितीपत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments