शासन आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली नवीन मराठी वर्णमाला महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादीसाठी स्वीकारलेली देवनागरी लिपी व वर्णमाला अद्यावत करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सर्व शासकीय कार्यालय निमशास्त्रीय कार्यालय शैक्षणिक संस्था विद्यापीठे मंडळ महामंडळ प्राधिकरणे मराठी पाठ्यपुस्तके इत्यादी मध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर हस्तलेखन टंकलेखन मुद्रण इत्यादी स्वरूपात केला जातो त्या सर्व ठिकाणी देवनागरी लिपीत प्रमाणिकृत मराठी वर्णमाला अक्षरमाला व अंक अशाप्रकारे वापरण्यात यावे याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 6 नोव्हेंबर 2009 अन्वय देण्यात आलेले आहेत.
सदर शासन निर्णयामध्ये काही सुधारणा बदल करणे आवश्यक असल्याचे मत काही शिक्षक लेखक यांनी शासनाकडे व्यक्त केले होते तसेच मराठी भाषेतील एकूण स्वर स्वरादी यांची संख्या प्रमाण लेखनाबाबतचे नियम सुपे करणे इत्यादी बाबत निश्चित कार्यवाही करण्याची मागणी काही व्यक्तींनी केली होती तसेच मराठी भाषेतील तत्सम तद्भव शब्दाबाबतचे नियम सोपे करण्याबाबत सन 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विभागास कपात सूचना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ६ नोव्हेंबर 2009 मधील बाबींवर पुनर्विचार करण्यासाठी आणि देवनागरी लिपीच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी मराठी भाषा प्रमाण लेखन निश्चितीकरण समिती मराठी भाषा विभाग शासन निर्णय दिनांक 29 सप्टेंबर 2019 स्थापन करण्यात आली.
सर्व समिती सदस्यांनी पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा करून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments